वॉशिंग्टन : ‘हायड्रॉक्सीक्लोरोक्विन’ औषधाच्या पुरवठ्यावरुन प्रत्युत्तर देण्याचा इशारा देणारे अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची भाषा अवघ्या 24 तासात बदलली. मोदी सरकारच्या भूमिकेचे समर्थन करत ‘नरेंद्र मोदी ग्रेट’ असल्याचे उद्गार ट्रम्प यांनी काढले. ‘फॉक्स न्यूज’ला दिलेल्या मुलाखतीत ट्रम्प यांनी कोरोना व्हायरसचा फैलाव रोखण्यासाठी भारत सरकारने उचललेल्या पावलांचेही कौतुक केले आहे. (Donald Trump praises Narendra Modi)
‘मी लाखो डोस विकत घेतले. जवळपास तीन कोटी (29 मिलिअन). मी भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदींशी बोललो, बर्याच गोष्टी भारतातूनच येतात. मी त्यांना विचारले की हायड्रॉक्सीक्लोरोक्विन पुरवाल का? ते महान आहेत. खरोखर चांगले आहेत. तुम्हाला माहित असेल, भारताला आवश्यकता असल्यामुळे त्यांनी निर्यंत थांबवली होती. पण त्यातून बर्याच चांगल्या गोष्टी घडत आहेत. आम्ही लस तयार करत आहोत. ‘जॉन्सन एंड जॉन्सन’ला याची चाचणी घेण्याची गरज आहे. असं वाटतं, मलेरियाचा प्रादुर्भाव अधिक असलेल्या देशांना कमी फटका बसला आहे’ असं डोनाल्ड ट्रम्प म्हणाले.
हेही वाचा : ‘WHO’ला चीनचा पुळका, तुमचा निधीच रोखतो, डोनाल्ड ट्रम्प यांची अरेरावी
‘कोरोना व्हायरस’च्या रुग्णांवरील उपचारांमध्ये वापरले जाणारे मलेरियावरील औषध ‘हायड्रॉक्सीक्लोरोक्विन’च्या निर्यातीवरील बंदी भारताने उठवली नाही, तर प्रत्युत्तर देण्याचा इशारा डोनाल्ड ट्रम्प यांनी काल दिला होता. गेल्याच महिन्यात भारत भेटीवर आलेली ट्रम्प यांनी सूडाची भाषा केल्याने आश्चर्य व्यक्त केले जात होतं.
‘हायड्रॉक्सीक्लोरोक्विनचा पुरवठा चालू ठेवला तर मी कौतुकच करेन. पण पुरवठा थांबला तर तुम्ही म्हणताय तसे प्रत्युत्तर द्यावे लागेल. आणि प्रत्युत्तर तरी का देऊ नये?’ असा सवाल ट्रम्प यांनी उपस्थित केला होता.
I spoke to him (PM Modi), Sunday morning & I said we appreciate it that you are allowing our supply (of Hydroxychloroquine) to come out, if he doesn’t allow it to come out, that would be okay, but of course, there may be retaliation, why wouldn’t there be?: US Pres Donald Trump pic.twitter.com/kntAqATp4J
— ANI (@ANI) April 6, 2020
‘कोरोना’बाधित अमेरिकेसह शेजारी देशांना माणुसकीच्या नात्याने पॅरासिटामॉल आणि हायड्रॉक्सीक्लोरोक्विन पुरवणार असल्याचं भारताने काल संध्याकाळी जाहीर केलं.
हायड्रॉक्सीक्लोरोक्विन काय आहे?
हायड्रॉक्सीक्लोरोक्विन हे मूळ मलेरियावरील औषध आहे. मलेरियाच्या रुग्णावर उपचार करण्यासाठी या गोळया दिल्या जातात. पण सध्या कोरोना व्हायरसवरील उपचारात हे औषध अत्यंत प्रभावी ठरत आहे. भारतात मोठया प्रमाणावर या औषधाची निर्मिती केली जाते. कोरोना व्हायरसच्या वाढत्या रुग्णसंख्येमुळे अमेरिकेला तातडीने या औषधांची गरज आहे. मागच्या महिन्यात भारताने हायड्रॉक्सीक्लोरोक्विन या औषधाच्या निर्यातीवर बंदी घातली होती.
The W.H.O. really blew it. For some reason, funded largely by the United States, yet very China centric. We will be giving that a good look. Fortunately I rejected their advice on keeping our borders open to China early on. Why did they give us such a faulty recommendation?
— Donald J. Trump (@realDonaldTrump) April 7, 2020
अमेरिकेत काल एकाच दिवशी जवळपास 2 हजार कोरोनाग्रस्तांना प्राण गमवावे लागले आहेत. एका दिवसात 1 हजार 934 ‘कोरोना’ग्रस्तांचा मृत्यू झाला असून एका दिवसातल्या सर्वाधिक बळींची नोंद झाली. अमेरिकेत काल 28 हजार 735 नवे ‘कोरोना’ रुग्ण आढळले असून कोरोनाबाधितांचा आकडा 4 लाखांच्या जवळ गेला आहे. (Donald Trump praises Narendra Modi)