2020 US election results | वॉशिंग्टन : अमेरिकन अध्यक्षपदाच्या निवडणुकीकडे (US President Election) सर्व जगाचं लक्ष लागलं असतानाच हाऊस ऑफ रिप्रेझेंटेटिव्हसाठी झालेल्या निवडणुकीत भारतीय वंशाच्या उमेदवाराचा पराभव झाला आहे. डेमोक्रेटिक पक्षाचे उमेदवार श्रीनिवास राव प्रेस्टन कुलकर्णी यांना टेक्सासमध्ये पराभवाचा धक्का बसला. (US President Election Live Update Indian origin Democratic Party Candidate Sri Preston Kulkarni lost from Texas)
रिपब्लिकन पक्षाचे दिग्गज नेते ट्रॉय नेहल्स यांनी श्रीनिवास कुलकर्णी यांचा पराभव केला. कुलकर्णी यांना एक लाख 58 हजार मतं मिळाली, तर नेहल्स यांनी एक लाख 81 हजार मतं मिळवत टेक्सासचा गड जिंकला. कुलकर्णी हे डेमोक्रेटिक पक्षाचे प्रबळ दावेदार मानले जात होते.
डेमोक्रेटिक पक्षाचे भारतीय वंशाचे चार उमेदवार हाऊस ऑफ रिप्रेझेंटेटिव्हसाठी पुन्हा निवडून आले आहेत. अॅमी बेरा, प्रमिला जयापाल, रो खन्ना आणि राजा कृष्णमूर्ती असं या विजयी उमेदवारांचं नाव आहे. विशेष म्हणजे राजा कृष्णमूर्ती यांनी या चारही उमेदवारांना ‘समोसा कॉकस’ असं नाव दिलं होतं.
श्रीनिवास राव प्रेस्टन कुलकर्णी यांचा परिचय
42 वर्षीय श्रीनिवास राव प्रेस्टन कुलकर्णी यांचा जन्म ल्युइजियानामध्ये (Louisiana) झाला. कुलकर्णी दोन वर्षांचे असताना त्यांचे कुटुंब ह्यूस्टनला स्थायिक झाले. त्यांचे वडील व्यंकटेश कुलकर्णी हे प्रसिद्ध कादंबरीकार होते. त्यांच्या मातोश्री मार्गारेट प्रेस्टन या वेस्ट व्हर्जिनियाच्या रहिवाशी होत्या.
कुलकर्णी यांनी युनायटेड स्टेट्स परराष्ट्र विभागात चौदा वर्षे काम केले. ते इराक, रशिया, इस्रायल, तैवान आणि जमैका अशा विविध देशांमध्ये कार्यरत होते. त्यांनी युनायटेड स्टेट्सचे सिनेटचा सदस्य किर्स्टन गिलिब्रांड यांचे संरक्षण सल्लागार म्हणूनही काम केले. श्रीनिवास कुलकर्णी यांनी 2017 मध्ये सेवेचा राजीनामा दिला आणि ते राजकीय मैदानात उतरले.
गेल्या वर्षीच श्रीनिवास कुलकर्णी यांनी टेक्सासमधून निवडणूक लढवण्याचे जाहीर केले. टेक्सासमध्ये विविध वंशाचे नागरिक स्थायिक आहेत. रिपब्लिकन पक्षाच्या पीट ओल्सन यांनी टेक्सासमधून पुन्हा निवडणूक न लढण्याची घोषणा केली होती. त्यामुळे कुलकर्णींच्या विजयाचा मार्ग सुकर मानला जात होता. परंतु रिपब्लिकन पक्षाकडून दिग्गज नेते ट्रॉय नेहल्स रिंगणात उतरल्याने कुलकर्णींना पराभवाची धूळ चाखावी लागली.
WE WON! Thank all y’all. This(US President Election Live Update Indian origin Democratic Party Candidate Sri Preston Kulkarni lost from Texas) was truly a great win. I look forward to representing our district in Congress and keeping my promise to be OUR voice. pic.twitter.com/RBe3FFFeUu
— Sheriff Troy Nehls (@SheriffTNehls) November 4, 2020
संबंधित बातम्या :
दोन विशाल राज्य गमावूनही ट्रम्पना विजय शक्य, 2016 च्या रणनीतीची पुनरावृत्ती होणार?
विरोधकांकडून मतदान प्रक्रिया प्रभावित, ट्रम्प यांचा आरोप, ट्विटरकडून शिक्षा
‘समोसा कॉकस’चा दबदबा; भारतीय वंशाच्या चौघांची हाऊस ऑफ रिप्रेझेन्टेटिव्हजमध्ये फेरनिवड
(US President Election Live Update Indian origin Democratic Party Candidate Sri Preston Kulkarni lost from Texas)