सुट्टी न दिल्याने पोलीस उपनिरिक्षकाची आत्महत्या, बातमी ऐकून आईचाही मृत्यू

| Updated on: Jan 05, 2020 | 4:02 PM

उत्तर प्रदेशात सुट्टी न मिळाल्याने एका पोलीस उपनिरीक्षकाने गळफास लावून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली. ही घटना उत्तर प्रदेशच्या महोबा जिल्ह्यात घडली.

सुट्टी न दिल्याने पोलीस उपनिरिक्षकाची आत्महत्या, बातमी ऐकून आईचाही मृत्यू
Follow us on

लखनऊ : उत्तर प्रदेशात सुट्टी न मिळाल्याने एका पोलीस उपनिरीक्षकाने गळफास लावून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली (sub inspector commit suicide). ही घटना उत्तर प्रदेशच्या महोबा जिल्ह्यात घडली. पोलीस उपनिरिक्षक रमाकांत सचान (वय 59) यांनी त्यांच्या शासकीय निवासस्थानी गळफास घेत आत्महत्या केली. रमाकांत यांच्या मृत्यूची बातमी ऐकून त्यांच्या आईला धक्का बसला, ते हे सहन करु शकल्या नाही आणि त्यांचाही मृत्यू झाला (sub inspector commit suicide).

पोलीस उपनिरिक्षक रमाकांत सचान यांच्या मृत्यूची माहिती मिळताच त्यांचे काक अविनाश सचान आणि जावई जसवंत सचान हे पोलीस ठाण्यात पोहोचले. तेव्हा उपनिरिक्षक रमाकांत सचान यांनी गळफास घेत आत्महत्या केल्याची माहिती पोलिसांनी त्यांना दिली.

रमाकांत यांची आई गेल्या काही काळापासून आजारी होत्या. रमाकांत त्यांच्या आईच्या उपचारासाठी गेल्या अनेक दिवसांपासून सुट्टी मागत होते. मात्र, त्यांना सुट्टी मंजूर करण्यात आलेली नाही. म्हणून त्यांनी हे पाऊल उचललं, असा आरोप रमाकांत यांच्या कुटुंबियांनी केला आहे.

शहर पोलीस ठाण्याचे पोलीस अधिकारी कुमार त्रिवेदी यांनी दिलेल्या माहितीनुसार, उपनिरिक्षक रमाकांत सचान हे गेल्या पाच वर्षांपासून त्या ठाण्यात तैनात होते. त्यानंतर प्रयागराज येथे त्यांची बदली झाल्यानंतर त्यांनी तीन वर्षांचा चार्ज पूर्ण केला होता, मात्र दोन वर्षांची त्यांची ड्युटी बाकी होती. रमाकांत यांच्यावर चार्ज सोडण्यासाठी कुठल्याही प्रकारचा दबाव नव्हता.

कानपूर जिल्ह्यातील सजेती पोलीस स्थानक क्षेत्रातील कमलापूर गावातील रहिवासी उपनिरिक्षक रमाकांत सचान यांनी शुक्रवारी (3 जानेवारी) नेहमीप्रमाणे त्यांचं काम केलवं. त्यानंतर ते त्यांच्या शासकीय निवासस्थानी गेले आणि तिथे जाऊन पंख्याच्या सहाय्याने गळफास घेत आत्महत्या केली.

sub inspector commit suicide