भरधाव ट्रकने टेम्पो आणि पिकअप कारला चिरडलं, 16 प्रवाशांचा मृत्यू

| Updated on: Aug 27, 2019 | 1:44 PM

उत्तर प्रदेशमध्ये झालेल्या भीषण अपघातात 16 प्रवाशांचा मृत्यू झाला आहे. एका ट्रकने टेम्पो आणि प्रवाशांनी परलेल्या पिकअप गाडीला चिरडले. ही घटना आज (27 ऑगस्ट) राष्ट्रीय मार्गावर जमुका जवळ घडली.

भरधाव ट्रकने टेम्पो आणि पिकअप कारला चिरडलं, 16 प्रवाशांचा मृत्यू
Follow us on

लखनऊ : उत्तर प्रदेशमध्ये झालेल्या भीषण अपघातात 16 प्रवाशांचा मृत्यू झाला आहे. एका ट्रकने टेम्पो आणि प्रवाशांनी परलेल्या पिकअप गाडीला चिरडले. ही घटना आज (27 ऑगस्ट) राष्ट्रीय मार्गावर जमुका जवळ घडली. या अपघातात अनेकजण गंभीर जखमी आहेत. तसेच मृतांच्या संख्येत वाढ होण्याची शक्यता आहे, असं सांगितलं जात आहे. पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून बचावकार्य सुरु आहे.

उत्तर प्रदेशातील जमुका जवळील राष्ट्रीय मार्गावर आज सकाळी एक टेम्पो जात होता. यावेळी मागून एक वेगवान ट्रक आला. हा ट्रक थेट टेम्पोवर धडकला आणि टेम्पोच्या पुढे असलेल्या पिकअप गाडीलाही ट्रकने धडक दिली. त्यामुळे हा ट्रक पलटी झाला. अपघात इतका भीषण होता की, जागीच 16 प्रवाशांचा मृत्यू झाला. मृतांमध्ये तीन महिला आणि तीन लहान मुलांचा समावेश आहे.

अपघातानंतर राष्ट्रीय महामार्गावर वाहतूक खोळंबा

सध्या घटनास्थळावर पोलिसांचे बचावकार्य सुरु आहे. टेम्पोखाली अनेक मृतदेह अडकले आहेत. टेप्मोखाली अडकलेल्या मृतदेहांना बाहेर काढण्याचे काम सुरु आहे. या अपघातामुळे सध्या मोठ्या प्रमाणात वाहतुकीचा खोळंबा झाला आहे. गाड्यांच्या मोठ्या रांगा लागल्या आहेत.