लखनौ : आग्र्यातील मुघल संग्रहालयाचे “छत्रपती शिवाजी महाराज संग्रहालय” असे नामांतर करण्यात आले आहे. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी सोमवारी यासंदर्भात घोषणा केली. (Uttar Pradesh CM Yogi Adityanath renamed Agra’s Mughal Museum as Chhatrapati Shivaji Maharaj)
मुख्यमंत्री आदित्यनाथ यांनी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे आग्रा विभागातील विकासकामांचा आढावा घेतला. यावेळी आग्र्यातील निर्माणाधीन मुघल संग्रहालय हे छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावे तयार होईल, अशी घोषणा त्यांनी केली.
“नव्या उत्तर प्रदेशात गुलामीची मानसिकता असलेल्या प्रतीकांना कोणतेही स्थान नाही. आपल्या सगळ्यांचे नायक छत्रपती शिवाजी महाराज आहेत. जय हिंद जय भारत” असे ट्वीट त्यांनी केले.
आगरा में निर्माणाधीन म्यूजियम को छत्रपति शिवाजी महाराज के नाम से जाना जाएगा।
आपके नए उत्तर प्रदेश में गुलामी की मानसिकता के प्रतीक चिन्हों का कोई स्थान नहीं।
हम सबके नायक शिवाजी महाराज हैं।
जय हिन्द, जय भारत।
— Yogi Adityanath (@myogiadityanath) September 14, 2020
महाराष्ट्राचे विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी योगी सरकारच्या निर्णयाचे स्वागत केले. “।। जय जिजाऊ, जय शिवराय ।। छत्रपती शिवाजी महाराज की जय !” अशी घोषणा फडणवीसांनी ट्विटरवरुन दिली.
।। जय जिजाऊ, जय शिवराय ।।
छत्रपती शिवाजी महाराज की जय !
Chhatrapati Shivaji Maharaj Ki Jai ! ?? https://t.co/Ro8sA00eOa— Devendra Fadnavis (@Dev_Fadnavis) September 14, 2020
शिल्पग्रामजवळील मुघल संग्रहालयातील एक भाग छत्रपती शिवाजी महाराजांशी संबंधित ऐवजांचे कायमस्वरुपी प्रदर्शन (गॅलरी) भरवण्यासाठी तयार केला जात आहे. यामध्ये शिवरायांच्या आग्रा आणि आग्र्याहून सुटकेच्या संबंधी कागदपत्रे प्रदर्शित केली जातील.
योगी सरकारने केलेली नामांतरे
याआधी, उत्तर प्रदेशातील मुघलसराय जंक्शनचे अधिकृत नामांतर दीन दयाल उपाध्याय जंक्शन असे करण्यात आले आहे. तर योगी सरकारने अलाहाबादचे नाव बदलून प्रयागराज केले. त्याच वेळी, योगी आदित्यनाथ यांनी 2018 मध्ये अयोध्येत झालेल्या दीपोत्सव कार्यक्रमात फैजाबाद जिल्ह्याचे नामकरण अयोध्या केले. (Uttar Pradesh CM Yogi Adityanath renamed Agra’s Mughal Museum as Chhatrapati Shivaji Maharaj)