11 रुपयांचे लॉकेट विकून फसवणूक, उत्तर प्रदेश पोलिसांकडून कोरोना बाबाला अटक

| Updated on: Mar 15, 2020 | 9:56 PM

उत्तर प्रेदश पोलिसांनी लखनऊमध्ये एका भोंदू बाबाला अटक (Police arrested corona baba in uttar pradesh) केली आहे.

11 रुपयांचे लॉकेट विकून फसवणूक, उत्तर प्रदेश पोलिसांकडून कोरोना बाबाला अटक
Follow us on

लखनऊ : उत्तर प्रेदश पोलिसांनी लखनऊमध्ये एका भोंदू बाबाला अटक (Police arrested corona baba in uttar pradesh) केली आहे. हा बाबा लोकांना 11 रुपयांचे लॉकेट विकून मी कोरोना रुग्णांना बरा करु शकतो, असा दावा करत होता. अहमद सिद्धिकी असं या भोंदू बाबाचे नाव (Police arrested corona baba in uttar pradesh) आहे. या बाबाच्या दाव्यामुळे उत्तर प्रदेशात कोरोना बाबाची जोरदार चर्चा सुरु होती.

या बाबाने आपल्या दुकानाबाहेर एक बोर्ड लावला होता. ज्यामध्ये या भयानक व्हायरसला ठिक करण्याचा दावा या बाबाने केला होता. “जे लोक मास्क लावू शकत नाही. ते लोक लॉकेट घालून कोरोनापासून लांब राहू शकतात”, असं त्या बोर्डवर लिहिले होते.

हे बोर्ड वाचून आरोग्य अधिकाऱ्यांनी याची माहिती पोलिसांनी दिली. पोलिसांनी फसवणूकीच्या आरोपाखाली या भोंदू बाबाला अटक केली आहे.

“आरोपी स्वत:ला कोरोना बाबा असल्याचे सांगत आहे. तसेच तो सर्वांची फसवणूक करत होता. लखनऊमध्ये आतापर्यंत दोन जणांना कोरोनाची लागण झाली आहे. तसेच 11 जणांवर संशय असल्याने ते डॉक्टरांच्या निगराणीखाली आहेत. त्यांचे रिपोर्ट अजून आले नाहीत”, असं अतिरीक्त पोलीस आयुक्त विकास चंद्र त्रिपाठी यांनी सांगितले.

लखनऊमध्ये दोन कोरोनाबाधित रुग्ण

उत्तरप्रदेशची राजधानी लखनऊमध्ये दोन कोरोनाबाधित रुग्ण भेटले आहेत. लखनऊमध्ये 22 वर्षाचा तरुणला कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले आहे. त्याच्यावर किंग जॉर्ज मेडिकल कॉलेजमध्ये उपचार सुरु आहेत.