नवी दिल्ली : संपूर्ण जगाला वेढा घातलेल्या कोरोना महामारीवर मात करण्यासाठी जगभरातील शास्त्रज्ज्ञ प्रयत्नांची शिकस्त करत आहेत. भारतातही या लस निर्मितीबाबत वेगात संशोधन सुरु आहे. पण अशास्थितीत जागतिक आरोग्य संघटनेचे प्रमुथ ट्रेडोस अधनोम घेब्रेसस यांनी अत्यंत खळबळजनक दावा केला आहे. एकट्या लसीच्या बळावर आपण कोरोनासारख्या महामारीला रोखू शकत नाही, असं घेब्रेसस यांनी म्हटलं आहे. WHOच्या प्रमुखांनीच हे वक्तव्य केल्यानं कोरोना लसीवर प्रश्नचिन्ह निर्माण झालं आहे.(A vaccine on its own will not end the #COVID19 pandemic, says WHO)
‘कोरोनावर मात करण्यासाठी अन्य उपाय किंवा साधनांसोबतच लस हे एक पुरक साधन असू शकेल. मात्र केवळ लस ही कोरोनाची महामारी संपवू शकणार नाही. त्यासाठी आपल्याला कोरोनाच्या चाचण्या, ट्रेसिंग, रुग्णांचं विलगीकरण आणि सोशल डिस्टन्सिंग पाळणं हे गरजेचं आहे’, असं WHOच्या प्रमुखांनी आपल्या ट्वीटमध्ये म्हटलं आहे.
A vaccine on its own will not end the #COVID19 pandemic. We will still need to continue:
-Surveillance
-Testing, isolating & caring for cases
-Tracing & quarantining contacts
-Engaging communities
-Encouraging individuals to be careful #ACTogether #EB147— Tedros Adhanom Ghebreyesus (@DrTedros) November 16, 2020
त्याचबरोबर ‘सुरुवातीच्या काळात कोरोनावरील लसीचा पुरवठा हा मर्यादित असेल. आधी आरोग्य कर्मचारी, वृद्ध नागरिक आणि अन्य जोखीम असलेल्या लोकांना प्राधान्य दिलं जाईल. त्यामुळे मृत्यूच्या संख्येचं प्रमाण कमी होईल आणि आरोग्य यंत्रणेला कोरोनाशी लढण्यास मदत होईल’, असं ट्वीट घेब्रेसस यांनी केलं आहे.
Initial supply of #COVID19 vaccines will be limited, so #healthworkers, older people & other at-risk populations will be prioritised. That will hopefully reduce the number of deaths & enable health systems to cope, but the virus will still have a lot room to move. #EB147
— Tedros Adhanom Ghebreyesus (@DrTedros) November 16, 2020
‘कोरोनावर मात करण्यासाठी एक लस आवश्यक असेल, हे आम्हाला कोरोना महामाराच्या सुरुवातीपासून माहिती होतं. पण ही लस कोरोनावर मात करण्यासाठीच्या इतर साधनांशी पूरक असेल. त्यांच्या जागी नाही.’ असं ट्वीटही घेब्रेसस यांनी केलं आहे. त्यामुळे कोरोनावर मात करण्यासाठी जगभरात सुरु असलेल्या संशोधनाविषयी आता एक प्रकारे प्रश्नचिन्ह निर्माण झालं आहे.
Since the beginning of the #COVID19 pandemic, we knew that a vaccine would be essential for bringing the pandemic under control. But it’s important to emphasise that a vaccine will complement the other tools we have, not replace them. #EB147 #ACTogether
— Tedros Adhanom Ghebreyesus (@DrTedros) November 16, 2020
भारत बायोटेकने (Bharat Biotech) सोमवारी कोव्हिड – 19 संसर्गावर मात करणाऱ्या भारतातील पहिल्या देशी लसीची म्हणजेच ‘कोव्हासिन’ची (covaxin) तिसऱ्या टप्प्यात चाचणी सुरू केली असल्याची घोषणा केली. फेज-3 चाचणीमध्ये संपूर्ण भारतातील 26,000 स्वयंसेवकांचा समावेश असणार आहे. याचं संचालन हे भारतीय वैद्यकीय संशोधन परिषद (आयसीएमआर) च्या संयुक्त विद्यमानं सुरू आहे.
देशभरात कोरोनाग्रस्त रुग्णांची संख्या 88 लाख 45 हजार 617 वर जाऊन पोहोचली आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार देशात सध्या 4 लाख 65 हजार 579 अॅक्टिव्ह केसेस आहेत. तर आतापर्यंत 82 लाख 47 हजार 950 रुग्ण बरे झाले आहेत. कोरोनामुळे आतापर्यंत 1 लाख 30 हजार 109 लोकांचा जीव गेला आहे.
जॉन हॉपकिन्स विद्यापीठाच्या आकडेवारीनुसार जगभरात कोरोना रुग्णांची संख्या 5 कोटी 53 लाख 31 हजार 233 झाली आहे. तर कोरोनामुळे आतापर्यंत 13 लाख 31 हजार 650 जणांचा कोरोनामुळं मृत्यू झाला आहे.
देशातली पहिली कोरोना लस ‘कोव्हासिन’ची तिसऱ्या टप्प्यात चाचणी सुरू, 26 हजार स्वयंसेवकांचा समावेश
Good News! भारतात डिसेंबरपर्यंत सिरम इन्स्टिट्यूट कोरोना लसीचे 10 कोटी डोस पुरवणार
A vaccine on its own will not end the #COVID19 pandemic, says WHO