पुण्यात गुंडांचा उच्छाद, दहशत निर्माण करण्यासाठी 55 गाड्यांची तोडफोड

| Updated on: Feb 02, 2020 | 10:45 AM

महाराष्ट्रातील सांस्कृतिक शहर म्हणून ओळख असलेल्या पुण्यात पुन्हा एकदा गुंडांचा उच्छाद पाहायला मिळाला आहे (Vandalism of vehicles in Pune).

पुण्यात गुंडांचा उच्छाद, दहशत निर्माण करण्यासाठी 55 गाड्यांची तोडफोड
Follow us on

पुणे : महाराष्ट्रातील सांस्कृतिक शहर म्हणून ओळख असलेल्या पुण्यात पुन्हा एकदा गुंडांचा उच्छाद पाहायला मिळाला आहे (Vandalism of vehicles in Pune). गुंडांनी दहशत निर्माण करण्यासाठी पुण्यातील सहकारनगर भागात जवळपास 55 गाड्यांची तोडफोड केली आहे (Vandalism of vehicles in Pune). यात रिक्षा आणि दुचाकींचा समावेश आहे. या घटनेमुळं नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण तयार झालं असून पुण्यातील कायदा सुव्यवस्थेवरच प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहेत.

सहकारनगरच्या तळजाई टेकडी भागात पहाटेच्या सुमारास हा प्रकार घडला. गुंडांनी 55 ते 60 गाड्या फोडल्या. यामागे नेमकं कोण आहे हे अद्याप स्पष्ट झालेलं नाही. पोलीस घटनास्थळी पोहचले असून तपास करत आहेत. गुंडांच्या या उच्छादामुळे नागरिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे. पुण्यात वारंवार अशाप्रकारच्या तोडफोड, मारहाण आणि जाळपोळीच्या घटना घडत आहेत. परिसरातील काही टोळ्या आपली दहशत निर्माण करण्यासाठी अधूनमधून असे प्रकार करत असल्याचंही बोललं जात आहे.

दरम्यान, वारंवार होणाऱ्या या घटनांमुळे पुणे पोलिसांना अद्यापही या गुंडांवर वचक निर्माण करणं शक्य झालं नसल्याचं स्पष्ट होत आहे. यात सर्वसामान्य माणसं मात्र भरडली जात आहेत. यावर आता तरी पुणे पोलीस कडक कारवाई करणार का असा संतप्त सवाल पुणेकरांकडून विचारला जात आहे.

व्हिडीओ: