PHOTO : चार वर्षाच्या मुलीकडून अर्नाळा किल्ल्याची स्वच्छता, समाजासाठी नवा आदर्श
वसई तालुक्यात ऐतिहासिक किल्ल्यांचा वारसा लाभला आहे. या तालुक्यात तीन पुरातन किल्ले आहेत. (Vasai arnala Fort cleanliness movement by four year girl)
-
-
वसई तालुक्यात ऐतिहासिक किल्ल्यांचा वारसा लाभला आहे. या तालुक्यात तीन पुरातन किल्ले आहेत. या किल्ल्याचे संवर्धन करणे, त्याचा इतिहास जपणे हे प्रत्येकाचे कर्तव्य आहे.
-
-
मात्र काही हौशी पर्यटक, प्रेमी युगल, मद्यप्रेमी दारु पिऊन या ठिकाणी धिंगाणा घालतात. या तरुण-तरुणींकडून किल्ल्यावर बेजबाबदारपणे गैरकृत्य केले जाते.
-
-
पण अवघ्या चार वर्षाच्या चिमुरडीने वसईतील अर्नाळा किल्ल्यावर चक्क स्वच्छता करत त्याचे पावित्र्य जपलं.
-
-
मुंबई पोलीस दलात कर्तव्य बजावणारे निनाद पाटील यांची चार वर्षांची मुलगी उर्वी पाटील हिने किल्ल्याचे पावित्र्य जपण्यासाठी त्याची साफसफाई केली.
-
-
शुक्रवारी अर्नाळा किल्ल्यात स्वच्छता मोहीम राबवून तिने तळीरामाना चांगलीच चपराक लगावली आहे. तर बेजबाबदारपणे वागणाऱ्यांसाठी एक आदर्श निर्माण केला आहे.
-
-
वसईतील अर्नाळा गावात राहणारे निनाद पाटील या किल्ल्याच्या संवर्धनासाठी अनेक दिवस काम करत आहेत.
-
-
अर्नाळा किल्यातील स्वच्छता, इतिहासाचे पावित्रा जपण्यासाठी त्यांनी अनेक जनजागृती मोहीम राबवली होती. या मोहिमेत त्यांची मुलगीही त्यांना साथ देते.
-
-
नुकतंच अर्नाळा किल्ल्यात राबवलेल्या स्वच्छता मोहिमेत तिने 50 हून अधिक बाटल्या उचलल्या, असे तिच्या वडिलांचे म्हणणं आहे.
-
-
विशेष म्हणजे अर्नाळा किल्ल्याच्या प्रवेशद्वारावर देवनागरी लिपीतील शिलालेख वाचणारी सर्वात कमी वयातील पहिली चिमुकली ठरली आहे.