वसई : चाकूचा धाक दाखवत गरीब लहान मुलांकडून रात्रीच्या अंधारात चोरी आणि गैरकृत्य करायला लावणाऱ्या एका माथेफिरुचा समाजसेवकांनी भांडाफोड केला आहे. वसईत रात्रीच्या वेळी काही लहान मुलं अंधारात रस्त्यावर फिरत असल्याचे पाहून काहींनी त्यांना हटकलं. त्यांची विचारपूस केल्यावर हा सर्व प्रकार उघडकीस आला. या माथेफिरुला चोप देत वालीव पोलिसांच्या ताब्यात देण्यात आलं आहे. तर 3 अल्पवयीन मुलांची सुटका केली आहे. (Vasai Police arrest child molesters)
वसईच्या एव्हरशाईन सिग्नल परिसरात राहणाऱ्या सामाजिक संस्थेतील कार्यकर्त्यांना घराशेजारी मित्रांशी गप्पा मारताना तीन मुलं रस्त्यावरुन फिरताना दिसली. एवढ्या रात्री ही मुलं कशाला फिरत आहे, अशी शंका आल्याने त्यांनी त्यांची विचारपूस केली. यावेळी त्यांच्यासमोर धक्कादायक माहिती समोर आली.
त्या मुलांच्या अवतीभोवती पवन प्रकाश कदा उर्फ मियाभाय नावाचा एक माथेफिरु फिरत होता. तो या तीन मुलांकडून चाकूचा धाक दाखवत गैरकृत्य करवून घेत होता. तसेच या लहानग्यांना दारु पाजून, त्यांना नशा करण्यास भाग पाडत होता. त्यानंतर त्यांना चोरी करण्यास भाग पाडत होता. तसेच ही सर्व मुलं भंगार गोळा करुन घरी मदत करतात.
मात्र मियाभाय हा आम्हाला चाकूचा धाक दाखवत आमच्याकडून भीक मागणे, चोरी करणे, नशा करणे अशी गैरकृत्य करायला लावतो, असा सर्व प्रकार त्यांनी कॅमेऱ्यासमोर सांगितला. खेळण्याबागडण्याच्या वयात घरातील हलाखीच्या परिस्थितीमुळे अनेक चिमुरड्यांवर पैसे कमवण्याची जबाबदारी येते. मात्र याचा काही लोक गैरफायदा घेतात.
या प्रकरणी सुटका केलेल्या एका मुलाचे वडील नसून फक्त आई आहे. त्यामुळे भंगार विकून तो आपल्या घरच्यांची जबाबदारी उचलतो.
विशेष म्हणजे या माथेफिरुकडे अजूनही पाच-सहा मुलं असल्याची माहिती या लहान मुलांनी पोलिसांना दिली. सध्या समाजसेवकांनी या मुलांची समाजसेवकांनी सुटका केली आहे. तर आरोपीला पोलिसांच्या ताब्यात दिलं आहे. माञ या टोळीत आणखी कोण-कोण आहे, तसेच इतर ही पीडित मुलांची सुटका कशी करावी, असा प्रश्न आता समाजसेवकांना पडला आहे. (Vasai Police arrest child molesters)
संबंधित बातम्या :
ऑनलाईन शॉपिंगमध्ये फसवणूक, साडे पाच हजाराच्या ड्रेस ऐवजी रद्दी, वापरलेल्या साड्या पार्सल
‘न्हावा-शेवा’तून 14 कोटींची विदेशी सिगारेट जप्त, सहा महिन्यातील तिसरी घटना, अद्याप कोणालाही अटक नाही