मोबाईल दुकानाचे शटर तोडून चोरी, वसई पोलिसांकडून आरोपीला अवघ्या 4 तासात अटक

| Updated on: Oct 07, 2020 | 8:16 AM

मोबाईल दुकानाचे शटर तोडून चोरी करणाऱ्या चोराला वसई पोलिसांनी अवघ्या 4 तासात अटक केली आहे.(Vasai Police arrest mobile shop theft in 4 hours)

मोबाईल दुकानाचे शटर तोडून चोरी, वसई पोलिसांकडून आरोपीला अवघ्या 4 तासात अटक
Follow us on

वसई : एका मोबाईल दुकानाचे शटर तोडून चोरी करणाऱ्या चोराला वसई पोलिसांनी अवघ्या 4 तासात अटक केली आहे. याप्रकरणी आरोपीकडून एकूण 1 लाख 63 हजारांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. (Vasai Police arrest mobile shop theft in 4 hours)

वसई गावातील झेंडा बाजारमधील एका मोबाईलच्या दुकानात रविवारी मध्यरात्री 2 वाजता चोरी झाल्याची घटना घडली होती. या दुकानाच्या शटरचे कुलूप तोडून चोरट्याने आत प्रवेश केला होता. त्यानंतर त्याने दुकानातील आयफोन, विवो, ओपो, सॅमसंग कंपनीचे मोबाईल लंपास केले होते.

तसेच दुकानातील मोबाईल इतर सामानाची चोरी करत एकूण 1 लाख 63 हजारांचा मुद्देमाल घेऊन तो फरार झाला होता. याबाबत वसई पोलीस ठाण्यात रविवारी मध्यरात्री अडीच वाजता दुकान मालकाने गुन्हा दाखल केला होता. वसई पोलिसांनी गुन्ह्याचा तात्काळ तपास सुरु केला होता.

या तपासादरम्यान सीसीटीव्हीच्या आधारे पोलिसांनी अवघ्या 4 तासात त्याला अटक केली. वसई कोळीवाडा येथे राहणाऱ्या ब्रॉनी ब्यूनेट कोयलो उर्फ बाबू असे या आरोपीचे नाव आहे. त्याच्याकडून चोरीला गेलेला माल हस्तगत करण्यात आला आहे.  (Vasai Police arrest mobile shop theft in 4 hours)

संबंधित बातम्या : 

पुतण्याला शिवीगाळ केल्यावरुन वाद, नागपुरात घरात घुसून शेजाऱ्याची निर्घृण हत्या

पालघरमध्ये हॉटेलबाहेर बाळाच्या अपहरणाचा प्रयत्न, भाजी विक्रेत्यामुळे महिलेला बेड्या