मुंबई : भारताच्या ‘गानकोकिळा’ लता मंगेशकर (Lata Mangeshkar) यांनी आपल्या सुमधुर आवाजाने अवघ्या विश्वातील रसिकांना मंत्रमुग्ध केले आहे. आज (28 सप्टेंबर) लतादीदी आपला 91वा वाढदिवस साजरा (Celebrating Birthday) करत आहेत. वयोमानापरत्वे त्या सध्या संगीत क्षेत्रापासून दूर असल्या तरी, त्यांच्या कलाकृती आजच्या नव्या दमाच्या गायक-गायिकांनाही भुरळ पाडतात (Veteran singer Lata Mangeshkar celebrating her 91st Birthday).
‘भारतरत्न’ लता मंगेशकर (Lata Mangeshkar) यांनी 36 भाषांमध्ये तब्बल 50 हजारहून अधिक गाणी गायली आहेत. आपल्या दैवी आवाजाने श्रोत्यांना मंत्रमुग्ध करणाऱ्या लतादीदी मात्र वडील मास्टर दीनानाथ मंगेशकर यांच्या समोर गाणे गाण्यास प्रचंड घाबरायच्या.
यशाच्या शिखरावर असलेल्या लता मंगेशकर यांनादेखील संघर्ष चुकला नाही. घर सांभाळण्यासाठी लता मंगेशकर यांनी गाणी गाण्यास सुरुवात केली. 1974पासून 1991पर्यंत प्रत्येक वर्षी सर्वाधिक गाणी गाणारी गायिका म्हणून लतादीदींचे नाव ‘गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड’मध्ये नोंदवण्यात आले होते (Veteran singer Lata Mangeshkar celebrating her 91st Birthday).
लतादीदी त्यांच्या वडिलांमुळे संगीत आणि गाणे शिकू शकल्या. मात्र, लतादीदी खूप छान गाऊ शकतात ही बाब त्यांच्या वडिलांना अनेक वर्ष ठावूक नव्हती. लतादीदीही त्यांच्या समोर गाणे गाण्यास घाबरत असत. स्वयंपाक घरात आईच्या मदतीला येणाऱ्या महिलांना त्या गाणी ऐकवत. परंतु, त्यावेळी त्यांची आई, त्यांना ओरडून बाहेर पिटाळत. त्यांची गाणी ऐकताना कामातून लक्ष विचलित होऊन, कामे बाजूला राहत, म्हणून आई त्यांना ओरडायच्या.
एके दिवशी दीनानाथ मंगेशकर यांचे शिष्य चंद्रकांत गोखले हे त्यांच्या घरी रियाजाला बसले होते. त्याचवेळी दीनानाथ मंगेशकर काही कामानिमित्ताने बाहेर गेले. वडील बाहेर जाताच लतादीदी रियाजच्या खोलीत जाऊन गोखले यांना, तुम्ही चुकीचे सूर गात आहात, असे म्हणाल्या. त्याचवेळी पाच वर्षांच्या लताने त्यांना योग्य सूर गाऊन दाखवले. घरी परतल्यावर त्यांनी लतादीदींना ते गाणे पुन्हा गाण्यास सांगितले. लहानग्या लताने ते गाणे गाऊन तिथून पळ काढला. यानंतर लता आणि मीना मंगेशकर यांनी वडिलांकडून संगीताचे शिक्षण घेण्यास सुरुवात केली (Veteran singer Lata Mangeshkar celebrating her 91st Birthday).
वयाच्या अवघ्या 13व्या वर्षी लतादीदींचे पितृछत्र हरपले. यावेळेस घराची जबाबदारी त्यांच्या खांद्यांवर येऊन पडली. लतादीदी आणि बहिण मीना मंगेशकर यांनी मुंबई गाठत मास्टर विनायक यांच्याकडे काम करण्यास सुरुवात केली. 1942मध्ये ‘पहिली मंगळागौर’ या चित्रपटात लातादीदींनी अभिनय केला. याच दरम्यान त्या काही लहान लहान भूमिका करून, गाणे देखील गात होत्या. संगीतकार गुलाम हैदर यांनी 18 वर्षांच्या लता मंगेशकर यांचा आवाज ऐकून शशिधर मुखर्जी यांच्याशी त्यांची भेट घडवून दिली. गुलाम हैदर यांनी ‘मजबूर’ या चित्रपटातील ‘अंग्रेजी छोरा चला गया’ हे गाणे लतादीदींकडून गाऊन घेतले. हा लतादीदींना मिळालेला पहिला मोठा ब्रेक होता. यानंतर त्यांना कधीच मागे वळून पाहावे लागले नाही.
1974मध्ये लंडनच्या ‘रॉयल अल्बर्ट हॉल’मध्ये सादरीकरण करणाऱ्या त्या पहिल्या भारतीय महिला ठरल्या. मी केवळ वडिलांमुळेच गाणे शिकू शकले, असे लता मंगेशकर नेहमी सांगतात.
(Veteran singer Lata Mangeshkar celebrating her 91st Birthday)
Spoke to respected Lata Didi and conveyed birthday greetings to her. Praying for her long and healthy life. Lata Didi is a household name across the nation. I consider myself fortunate to have always received her affection and blessings. @mangeshkarlata
— Narendra Modi (@narendramodi) September 28, 2020
संबंधित बातम्या :
जयप्रभा स्टुडिओच्या विभाजनासाठी लतादीदींचा प्रस्ताव, कोल्हापूरकरांमध्ये संताप
लता मंगेशकरांना रुग्णालयातून डिस्चार्ज, चाहत्यांसह उपचार करणाऱ्या डॉक्टरांचे ट्विटवरुन आभार
“नरेंद्रभाई आपके लिए मेरी ये राखी”, भेट म्हणून लता मंगेशकरांनी पंतप्रधान मोदींकडून घेतलं ‘हे’ वचन