नागपूर : मध्य प्रदेशातल्या धरणातून पाण्याचा विसर्ग असो (Vidarbha Flood Damage) की गोसीखुर्दमधून, वेळीच अलर्ट न दिल्यानं लोकांचं अतोनात नुकसान झालं आहे. याच नुकसानीची पाहणी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीसांनी केली. तर तात्काळ 10 हजारांच्या मदतीची घोषणा सरकारनं केली (Vidarbha Flood Damage).
हे पावसामुळे झालेले नुकसान नाही. तर मध्य प्रदेशातील संजय सरोवर आणि गोसेखुर्द धरणातल्या विसर्गामुळं आलेल्या महापुरामुळं झालं. शेती नष्ट झाली, घरं कोसळली, तर धान्यंही महापुराच्या पाण्यात भिजलं. घरात चिखलाचं साम्राज्य पसरलं. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीसांनीही या नुकसानीची पाहणी केली.
महापूर ओसरल्यानंतर आता पडलेली घरं आणि मोडलेला संसार डोळ्यासमोर आहे. मुलं आणि पत्नीला पुराच्या पाण्यातून वाचवताना, झुल्लर गावातील ज्ञानेश्वर यांच्या जगण्याचा आधार असलेल्या शेळ्याही वाहून गेल्या.
गडचिरोली जिल्ह्यातही शेतकरी आणि गोरगरिबांचं प्रचंड नुकसान झालं. देसाईगंज, आरमोरी, अहेरी आणि सिरोंचा तालुक्याला महापुराचा मोठा फटका बसला. अन्नधान्य आणि कपड्यांसह घरातलं सामनानंही वाहून गेलं. तर राहता येईल अशी घरांची स्थितीही राहिलेली नाही.
शेतीबद्दल बोलायचं झालं तर शेतात तुडूंब पाणी साचलं आणि पीकंही नष्ट झाली. गडचिरोलीत जवळपास 10 हजार हेक्टर शेती पाण्याखाली गेली (Vidarbha Flood Damage).
चंद्रपूर जिल्ह्यातलीही परिस्थिती यापेक्षा वेगळी नाही. गोसेखुर्द धरणातील विसर्गामुळं वैनगंगा नदीला महापूर आला. ब्रम्हपुरीतल्या पारडगावात आता पडलेल्या घराच्या ढिगाऱ्यात काही सामान शिल्लक आहे का? याच शोध घेतला जातो. तर कुठं कुठं घराची साफसफाई सुरु आहे. महापुरामुळे शेतातली पीकं पूर्णपणे आडवी झालीत..कारखान्यांमध्ये अजूनही स्वीमिंग पूर सारखं दृश्ंय आहे
सरकारनं आता तातडीची 10 हजारांची मदत जाहीर केली. पंचनामे होऊनही प्रत्यक्ष झालेलं नुकसान काही भरुन निघणार नाही. पण तातडीची 10 हजारांची मदत त्वरित मिळावी, ही अपेक्षा आहे. कारण कपडेही वाहून गेलेत आणि घरातलं अन्नधान्यही भिजलं.
गडचिरोलीत पुरामुळे घरांसह शेतीचे नुकसान, लवकरात लवकर मदत देण्याचे एकनाथ शिंदेंचं आश्वासनhttps://t.co/IS6lw09NJV #Gadchiroli #Flood #Maharashtra @mieknathshinde
— TV9 Marathi (@TV9Marathi) August 31, 2020
Vidarbha Flood Damage
संबंधित बातम्या :
चंद्रपूर, भंडारा, गडचिरोलीत पूर, गोसेखुर्द धरणातून विसर्ग कमी करणार, विजय वडेट्टीवारांची माहिती