लखनऊ : महाराष्ट्र, केरळ, दिल्ली, उत्तरप्रदेश या ठिकाणी (Bareilly labours disinfectant video) कोरोनाग्रस्त रुग्णांची संख्या वाढत आहे. भारतात कोरोनाबाधितांची संख्या 1000 च्या वर गेली (Bareilly labours disinfectant video) आहे. तर दुसरीकडे प्रशासनाच्या असंवेदनशीलतेचा प्रश्नही समोर येत आहे. नुकतंच उत्तरप्रदेशात मजुरांना सॅनिटाईज करण्यासाठी अंगावर औषधाची फवारणी करण्यात आली. उत्तरप्रदेशात हा संतापजनक प्रकार पाहायला मिळाला असून याबाबतचा एक व्हिडीओही व्हायरल होत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, व्हायरल होणारा हा (Bareilly labours disinfectant video) व्हिडीओ उत्तरप्रदेशातील बरेली या ठिकाणचा आहे. दिल्ली, हरियाणा, नोएडा या ठिकाणावरुन हजारो कामगार हे उत्तरप्रदेशात आले होते. त्यावेळी या सर्व मजूरांना जमिनीवर बसवण्यात आले. त्यांच्या अंगावर एका विशिष्ट प्रकारच्या औषधाची फवारणी करण्यात आली. यात महिला आणि लहान मुलांचाही समावेश होता. यानंतर काही जणांना डोळ्यात जळजळ होण्यास सुरुवात झाली. मात्र तरीही या लोकांना रुग्णालयात न पाठवता थेट घरी पाठवण्यात आले.
हे औषध या मजुरांना सॅनिटाईज करण्यासाठी वापरले जात असल्याचे बोललं जात आहे. हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांनी दोषींच्या विरोधात कडक कारवाईचे आदेश दिले आहे.
अमानवीय
बरेली में बाहर से आए मज़दूरों और बच्चों को छिड़काव करके ‘सेनेटाइज’ किया जा रहा है.
अगर ये छिड़काव कीटनाशक का है तो ख़तरनाक है. अक्षम्य है.
बरेली प्रशासन जवाब दें कि किस मेडिकल प्रोटोकॉल के तहत ये काम किया जा रहा है?@vinodkapri pic.twitter.com/PzKoAoFElA
— Milind Khandekar (@milindkhandekar) March 30, 2020
“या व्हिडीओच्या सत्यतेची पडताळणी करण्यात आली आहे. यात ज्या मजूरांचा समावेश होता त्यांच्यावर उपचार सुरु आहेत. बरेलीच्या अग्निशमन दलाला मजूरांना सॅनिटाईज करण्याचे निर्देश दिले होते,” अशी प्रतिक्रिया संबंधित जिल्हाधिकाऱ्यांनी दिली.
इतकंच नव्हे तर बहुजन समाज पार्टीच्या राष्ट्रीय अध्यक्ष्रा मायावती, समाजवादी पार्टीचे अध्यक्ष अखिलेश यादव आणि काँग्रेस नेत्या प्रियांका गांधी यांनीही प्रशासनावर कारवाई करण्याची मागणी केली (Bareilly labours disinfectant video) आहे.