इंग्लंड (लंडन) : लंडनमधील ओव्हल मैदानावर आज (9 जून) भारत आणि ऑस्ट्रेलियाचा सामना सुरु आहे. हा सामना पाहण्यासाठी भारतातील बँकांना कोट्यवधींचा चुना लावून पसार झालेल्या विजय मल्ल्यानेही हजेरी लावली आहे. सध्या मल्यावर लंडनच्या कोर्टात मल्ल्याच्या प्रत्यार्पण संदर्भात खटला सुरु आहे.
यावेळी न्यूज एजन्सी एएनआयने मल्ल्याला त्याच्यावर सुरु असलेल्या खटल्या संदर्भात प्रश्न विचारला, मात्र मल्ल्याने मी इथे सामना पाहायला आलोय, असे उत्तर देत तेथून निघून गेला. यापूर्वी मल्ल्या 2018 मध्ये भारत आणि इंग्लंडचा सामना पाहण्यासाठी पोहचले होते. कर्ज फेडता आले नसल्याने आणि मनी लॉन्ड्रिंगसारख्या प्रकरणामुळे भारताकडून ब्रिटनकडे मल्ल्याला भारतात पाठवण्याची मागणी करत आहे.
#WATCH London: Vijay Mallya arrives at The Oval cricket ground to watch #IndvsAus match; says, “I am here to watch the game.” #WorldCup2019 pic.twitter.com/RSEoJwsUr9
— ANI (@ANI) June 9, 2019
भारताला मल्ल्याच्या प्रत्यार्पण प्रकरणात एप्रिलमध्ये मोठे यश मिळाले. सीबीआय आणि प्रवर्तन निदेशालय (ईडी) ने मल्ल्यावर फसवणूक, मनी लॉन्ड्रिंग आणि परदेशी मुद्रा प्रबंधन अधिनियम (फेमा) चे उल्लंघन केल्याचे आरोप त्याच्यावर केले आहेत.
10 डिसेंबर 2018 रोजी वेस्टमिंस्टर मॅजिस्ट्रेटच्या कोर्टाने मल्ल्याच्या प्रत्यर्पणाचे आदेश दिले होते. यानंतर मल्ल्याने हायकोर्टात अपील केलं होते. वेस्टमिंस्टर मॅजिस्ट्रेट कोर्टाचे चीफ मॅजिस्ट्रेट जस्टिस एम्मा अर्बुथनोट यांनी त्यावेळी मल्ल्याचे प्रकरण गृह सचिव साजिद जावेद यांच्याजवळ पाठवले होते. त्यांनीही फेब्रुवारीमध्ये प्रत्यर्पणाची मंजूरी दिली होती.
मल्ल्या 9 हजार कोटी रुपयांचे कर्ज फेडण्यासाठी अयशस्वी ठरला. त्यामुळे त्याने 2 मार्च 2016 रोजी भारतातून पलायन केले होते. हे कर्ज त्यांनी किंगफिशर एअरलाईन्ससाठी घेतले होते.