चंद्रपूर : राज्यासह जगभरात कोरोनानं थैमान घातलं आहे. अशास्थितीत प्रत्येक ठिकाणी कोरोना संसर्ग रोखण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. मात्र संशयित रुग्णांसह बाधित रुग्णांना वेगळं करुन ठेवण्यात अनेक अडचणी येत आहेत. यावरच उपाय म्हणून चंद्रपूर जिल्हा प्रशासन होम क्वारंन्टाईन (घरीच विलगीकरण) केलेल्या संशयित रुग्णांना जीपीएस ट्रॅकिंग मशीन (GPS Tracking Machine) लावण्याचा विचार करत आहे. चंद्रपूरचे पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांनी स्वतः याबद्दल माहिती दिली (GPS Tracking home quarantine Corona).
जिल्हा प्रशासनाने होम क्वारंन्टाईन होण्याच्या सूचना दिलेले रुग्ण बेजबाबदारपणे वागत असल्याचं समोर येत आहे. त्यावर उपाय म्हणून चंद्रपूर जिल्हा प्रशासनाने GPS ट्रॅकिंगचा पर्यायाची अंमलबजावणी करण्याचा विचार सुरु केला आहे. जीपीएस बेल्ट संशयित रुग्णांच्या हातावर लावण्याबाबत प्रशासनाकडून शक्यता तपासली जात आहे.
चंद्रपूरचे पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांनी कोरोना संसर्गाबाबत जिल्हाधिकारी कार्यालयात आढावा बैठक घेतली. यामध्ये होम क्वारंन्टाईन केलेल्या लोकांकडून सूचनांचं उल्लंघन होत असल्याच्या तक्रारी आल्या. तसेच याबाबत चिंता व्यक्त करण्यात आली. यानंतर या उपाययोजनेवर विचार केला जात आहे.
चंद्रपूर जिल्ह्यात सध्या 1500 लोकांना त्यांच्या घरीच विलगीकरण करुन थांबण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. यामध्ये अधिकांश लोक पुण्यातून आलेले आहेत. मात्र, हे लोक अनेकदा बाहेर फिरत असल्याचं आढळून आलं आहे. त्यामुळे जीपीएस ट्रॅकिंगच्या जालीम उपायांवर विचार होत आहे. स्वतः विजय वडेट्टीवार यांनीच याविषयी माहिती दिली आहे.
महाराष्ट्रात कुठे किती कोरोनाबाधित रुग्ण?
कोरोनाचे कुठे किती रुग्ण?
मुंबई – 39
पुणे – 16
पिंपरी चिंचवड – 12
नागपूर – 4
यवतमाळ – 4
कल्याण – 4
नवी मुंबई – 3
अहमदनगर – 2
पनवेल – 1
ठाणे -1
औरंगाबाद – 1
रत्नागिरी – 1
उल्हासनगर – 1
एकूण 89
महाराष्ट्रात कुठे आणि कधी कोरोनाचे रुग्ण आढळले?
पुण्यातील दाम्पत्य (2) – 9 मार्च
पुण्यातील दाम्पत्याची मुलगी (1) – 10 मार्च
पुण्यातील कुटुंबाचा नातेवाईक (1)– 10 मार्च
पुण्यातील कुटुंबाला नेणारा टॅक्सी चालक (1)– 10 मार्च
मुंबईतील सहप्रवासी (2) – 11 मार्च
नागपूर (1) – 12 मार्च
पुणे (1) – 12 मार्च
पुणे (3) – 12 मार्च
ठाणे (1) – 12 मार्च
मुंबई (1) – 12 मार्च
नागपूर (2) – 13 मार्च
पुणे (1) – 13 मार्च
अहमदनगर (1) – 13 मार्च
मुंबईत (1) – 13 मार्च
नागपूर (1) – 14 मार्च
यवतमाळ (2) – 14 मार्च
मुंबई (1) – 14 मार्च
वाशी (1) – 14 मार्च
पनवेल (1) – 14 मार्च
कल्याण (1) – 14 मार्च
पिंपरी चिंचवड (5) – 14 मार्च
औरंगाबाद (1) – 15 मार्च
पुणे (1) – 15 मार्च
मुंबई (3) – 16 मार्च
नवी मुंबई (1) – 16 मार्च
यवतमाळ (1) – 16 मार्च
नवी मुंबई (1) – 16 मार्च
मुंबई (1) – 17 मार्च
पिंपरी चिंचवड (1) – 17 मार्च
पुणे (1) – 18 मार्च
पिंपरी चिंचवड (1) – 18 मार्च
मुंबई (1) – 18 मार्च
रत्नागिरी (1) – 18 मार्च
मुंबई महिला (1) – 19 मार्च
उल्हासनगर महिला (1) – 19 मार्च
अहमदनगर (1) – 19 मार्च
मुंबई (2) – 20 मार्च
पुणे (1) – 20 मार्च
पिंपरी चिंचवड (1)- 20 मार्च
पुणे (2) – 21 मार्च
मुंबई (8) – 21 मार्च
यवतमाळ (1) – 21 मार्च
कल्याण (1) – 21 मार्च
मुंबई (6) – 22 मार्च
पुणे (4) – 22 मार्च
मुंबई (14) – 23 मार्च
पुणे (1) – 23 मार्च
एकूण – 89 कोरोनाबाधित रुग्ण
कोरोनामुळे आतापर्यंत कुठे किती मृत्यू?
राज्य | कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण (भारतीय) | कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण (विदेशी) | डिस्चार्ज | मृत्यू |
---|---|---|---|---|
दिल्ली | 16 | 1 | 2 | 1 |
हरियाणा | 4 | 14 | ||
केरळ | 33 | 7 | 3 | |
राजस्थान | 21 | 2 | 3 | |
तेलंगाणा | 10 | 9 | 1 | |
उत्तर प्रदेश | 22 | 1 | 9 | |
लडाख | 10 | |||
तमिळनाडू | 3 | 1 | ||
जम्मू-काश्मीर | 4 | |||
पंजाब | 6 | 1 | ||
कर्नाटक | 15 | 1 | 1 | |
महाराष्ट्र | 59 | 3 | 1 | |
आंध्रप्रदेश | 3 | |||
उत्तराखंड | 3 | |||
ओडिशा | 2 | |||
पश्चिम बंगाल | 2 | |||
छत्तीसगड | 1 | |||
गुजरात | 9 | |||
पाँडेचरी | 1 | |||
चंदीगड | 5 | |||
मध्यप्रदेश | 4 | |||
हिमाचल प्रदेश | 2 | |||
236 | 38 | 23 | 4 |
संबंधित बातम्या :
मोदी सरकारकडून जागतिक आरोग्य संघटनेच्या सूचनांना केराची टोपली, राहुल गांधींचा गंभीर आरोप
कोणाला कोंबडा बनवलं, कोणाला उठाबशा, जमावबंदी आदेश मोडणाऱ्या टवाळांना पोलिसांकडून शिक्षा
जमावबंदीच्या आदेशाला केराची टोपली, इचकरंजीत रस्त्यावर गर्दी करणाऱ्यांवर पोलिसांची कारवाई
Corona Virus India | देशात कोरोनाबाधितांचा आकडा 400 पार, महाराष्ट्रात सर्वाधिक कोरोना रुग्ण
संबंधित व्हिडीओ:
GPS Tracking home quarantine Corona