नवी दिल्ली: बॉलिवूड अभिनेत्री सनी लिओनी सध्या एका व्हिडीओमुळे चांगलीच चर्चेत आहे. या व्हिडीओमध्ये सनी लिओनी एका व्यक्तीसोबत विमानतळावर जाताना दिसते. सनी लिओनीसोबत दिसणारी व्यक्ती टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहली असल्याचं म्हटलं जात आहे. हा व्हिडीओ वेगाने सर्वत्र व्हायरल होत आहे. मात्र या व्हिडीओमागील सत्य समजल्यास तुम्हाला हसू आवरणार नाही.
या व्हिडीओत सनी लिओनी विमानतळाकडे जाताना दिसते. तिच्यासोबत असणारा तरुण हा विराट कोहलीसारखाच दिसतो. तो सनीसोबत बोलण्याचा प्रयत्न करत आहे. मात्र व्हिडीओत दिसणारा व्यक्ती हा विराट कोहली नाही तर दुसराच आहे.
हा व्हिडीओ पाहून सोशल मीडियावर अनेकांनी हा विराटच असल्याचं म्हटलं. मात्र विराटसारखा दिसणारा हा व्यक्ती विराट नसल्याचं स्पष्ट आहे.
आयपीएलमध्ये रविवारी हैदराबाद विरुद्ध बंगळुरु यांच्यात सामना झाला. मात्र या सामन्यापूर्वीच हा व्हिडीओ व्हायरल झाल्याने, अनेकांनी विराट कोहली आणि सनी लिओनीची भेट झाल्याच्या कमेंट करण्यास सुरुवात केली.
व्हिडीओतील व्यक्ती विराटसारखा दिसत असल्याने लोकांनी त्याला विराटच संबोधलं. विराल भयानीने हा व्हिडीओ आपल्या इन्स्टा अकाऊंटवर शेअर केला आहे.
दरम्यान, कालच्या सामन्यात हैदराबादने विराट कोहलीच्या बंगळुरुचा तब्बल 118 धावांनी पराभव केला. हा आमचा सर्वात लाजिरवाणा पराभव असल्याचं विराट कोहलीने म्हटलं होतं.
VIDEO: