वर्धा : ‘कोरोना’वर मात करणाऱ्या 21 वर्षीय तरुणीचा मेंदूज्वराने मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना समोर आली आहे. वर्धा जिल्ह्यातील सावंगी मेघे रुग्णालयात आज पहाटेच्या सुमारास तरुणीने अखेरचा श्वास घेतला. (Wardha Lady won battle against Corona Dies of Meningitis)
ही तरुणी मूळ अमरावती जिल्ह्याच्या धामणगाव रेल्वे येथील होती. 8 मे रोजी सावंगी मेघे रुग्णालयात मेंदूज्वराच्या उपचारासाठी तिला दाखल करण्यात आले. 10 मे रोजी या तरुणीच्या कोरोना चाचणीचा अहवाल पॉझिटिव्ह आला होता.
तरुणीवर रुग्णालयात गेले अनेक दिवस उपचार करण्यात आले. चार दिवसांपूर्वी तिचा रिपोर्ट निगेटिव्ह आला. उपचारादरम्यान तरुणीने ‘कोरोना’वर मात केली होती, मात्र मेंदूज्वराने तिचा मृत्यू झाला.
हेही वाचा : कुटुंब नाकारतं…पुण्यातील कोरोनोबळींवर करतात ‘ते’ अंत्यसंस्कार
तरुणीच्या संपर्कात आलेली तिची आई आणि दोन बहिणीसुद्धा कोरोना पॉझिटिव्ह आढळल्या होत्या. 29 मे रोजी तिची आई आणि एका बहिणीने कोरोनावर मात केल्याने त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला, तर एक जूनला दुसऱ्या बहिणीला घरी पाठवण्यात आले. तर आज पहाटे साडेचारच्या सुमारास या तरुणीची प्राणज्योत मालवली.
वर्धा जिल्ह्यात एकूण 20 कोरोनाबाधित रुग्ण आढळले होते. यापैकी तिघांचा मृत्यू झाला असून सात जणांनी कोरोनावर मात केली आहे. तर दहा रुग्णांवर रुग्णालयात उपचार सुरु आहेत.
VIDEO : सुपरफास्ट 50 न्यूजhttps://t.co/KIqzAX4NOa
— TV9 Marathi (@TV9Marathi) June 2, 2020
(Wardha Lady won battle against Corona Dies of Meningitis)