वर्ध्यातील आर्वी नगरपरिषदेत भाजपात अंतर्गत कलह, नगराध्यक्षाच्या खुर्चीला चपलांचा हार

| Updated on: Sep 01, 2020 | 5:32 PM

वर्ध्यातील आर्वी नगर परिषदेचे भाजप नगराध्यक्ष प्रशांत सव्वालाखे यांच्या खुर्चीला चपलांचा हार घालण्यात आला.  (Wardha Arvi Nagar Parishad BJP Corporator Fight)

वर्ध्यातील आर्वी नगरपरिषदेत भाजपात अंतर्गत कलह, नगराध्यक्षाच्या खुर्चीला चपलांचा हार
Follow us on

वर्धा : गेल्या काही दिवसांपासून शहरात दुर्गंधीचे वातावरण पसरलं आहे. या कारणामुळे वर्ध्यातील आर्वी नगर परिषदेचे भाजप नगराध्यक्ष प्रशांत सव्वालाखे यांच्या खुर्चीला चपलांचा हार घालण्यात आला.  वर्ध्याच्या आर्वी नगर परिषेदेत भाजपची एकहाती सत्ता आहे. या नगरपरिषदेत 22 नगरसेवक आणि नगराध्यक्षही भाजपचा आहे. एकही विरोधी नगरसेवक नसलेल्या या नगरपरिषदेत भाजपमध्ये अंतर्गत कलह पाहायला मिळत आहे. याच कलहातून नगराध्यक्ष प्रशांत सव्वालाखे यांच्या खुर्चीला चपलांचा हार घालण्यात आला. (Wardha Arvi Nagar Parishad BJP Corporator Fight)

वर्धा शहरात मागील काही दिवसांपासून कंत्राटी सफाई कर्मचाऱ्यांचे पगार न झाल्याने शहरात दुर्गंधीचे वातावरण पसरलं आहे. हे सर्व नगराध्यक्षाच्या कारभारामुळे निर्माण झाल्याचा आरोप केला जात आहे. त्यामुळे नगराध्यक्षांच्या खुर्चीला चक्क चपलांचा हार आणि बेशरामच्या झाडाची भेट खुर्चीला देण्यात आली आहे.

यावेळी आरोग्य सभापती गंगा सुभाष चकोले, गट नेता प्रशांत ठाकूर, नगरसेवक जगन गाठे, माजी आरोग्य सभापती रामू राठी, प्रकाश गुलहाने, हर्षल पांडे, मिथुन बारबैले, मनोज कसर, कैलास गळहाट, उशा सोनटक्के आणि इतर नगरसेवक उपस्थित होते.

सध्या कोरोनाच्या संकट काळ असताना शहरात कंत्राटी कामगारांना वेतन न दिल्याने काम बंद केल्याचा आरोप होत आहे. यामुळे शहरात घंटा गांडी किंवा कचरा उचलणाचे काम बंद असल्याने घाणीचे साम्राज्य पसरले आहे. हा सर्व प्रकार नगराध्यक्ष प्रशांत सव्वालाखे यांच्या मनमानी कारभारामुळे सुरु असल्याचं बोललं जात आहे.

गेल्या काही दिवसांपासून शहरात स्वच्छता कर्मचाऱ्यांनी काम बंद केले. शहरात रोजच्या अस्वच्छतेसाठी नागरिकांना उत्तर द्यावे लागतात आहे. नगरसेवक म्हणून नागरिकांना सोयी सुविधा देणे हे आमचे कर्तव्य आहे. नगराध्यक्ष यांनी मागील काही दिवसात एकही बैठक घेतली नसल्याच आरोप केला जात आहे. (Wardha Arvi Nagar Parishad BJP Corporator Fight)

संबंधित बातम्या : 

शेतकऱ्याचा नावाखाली बेकायदेशीर व्यापार, केंद्राच्या आदेशाला मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीच्या संचालक मंडळाचा विरोध

कौंटुबिक वादाला कंटाळून महिलेचा रेल्वे ट्रॅकवर आत्महत्येचा प्रयत्न, आरपीएफ जवानाने जीव धोक्यात घालून वाचवले