वर्धा : पाण्याच्या टाकीत बुडून मृत्यू झालेल्या चिमुकल्याचा मृतदेह शवविच्छेदनगृहात ठेवला असताना उंदरांनी कुरतडला. वर्धा जिल्ह्यातील समुद्रपूरच्या ग्रामीण रुग्णालयात हा संतापजनक प्रकार घडला. (Wardha Boy Dies Drowning in Water Tank Dead Body gnawed by Rats)
समुद्रपूर तालुक्यातील रेणकापूर येथे पाण्याच्या टाकीत बुडून मृत्यू झालेल्या अडीच वर्षीय चिमुकल्याचा मृतदेह शुक्रवारी शवविच्छेदनासाठी ग्रामीण रुग्णालयाच्या शवविच्छेदनगृहात ठेवण्यात आला होता. मृतदेह सकाळी बाहेर काढला असता तो उंदरांनी कुरतडल्याचे दिसून आले.
हा प्रकार चिमुकल्याच्या कुटुंबीयांना कळताच त्यांनी रुग्णालय प्रशासनाविरोधात रोष व्यक्त केला. गावकऱ्यांनी व्यक्त केलेल्या संतापामुळे काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.
रेणकापूरमध्ये अडीच वर्षीय प्रथम ऊर्फ गणेश राजू निखाडे या चिमुरड्याचा काल (शुक्रवारी) सायंकाळी मृत्यू झाला. प्रथम हा घराच्या अंगणात सात वर्षीय बहिणीसोबत खेळत होता. खेळताना अचानक तो पाण्याच्या टाकीत पडला. वडीलांसह परिसरातील नागरिकांनी त्याला लगेच बाहेर काढून ग्रामीण रुग्णालयात नेले. परंतु डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले होते.
कुटुंबीयांनी मृतदेह देण्याची मागणी केली असता रुग्णालयाकडून शवविच्छेदन केल्याशिवाय मृतदेह देण्यास नकार देण्यात आला. रात्रभर बालकाचा मृतदेह शवविच्छेदनगृहात ठेवण्यात आला. आज (शनिवारी) सकाळी शवविच्छेदन करण्यासाठी तो बाहेर काढला, तेव्हा उंदराने कुरतडल्याचे दिसून आले. (Wardha Boy Dies Drowning in Water Tank Dead Body gnawed by Rats)
हेही वाचा : लग्नाच्या पहिल्याच रात्री हत्येचा थरार, पत्नीचा जीव घेऊन 24 वर्षीय तरुणाचा गळफास
हा प्रकार चिमुकल्याच्या कुटुंबीयांना कळताच रुग्णालय परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन तहसीलदार राजू रणवीर यांच्यासह पोलिसांनी रुग्णालय गाठले. या घटनेत दोषी डॉक्टरांवर कारवाई करण्याची मागणी मृत बालकाच्या कुटुंबीयांनी केली आहे.
या संदर्भात एक चौकशी समिती गठित करण्यात आली आहे. या समितीचा अहवाल प्राप्त होताच दोषींवर कठोर कारवाई करणार असल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सकांनी दिली आहे.
तहसीलदारांनी प्रकरणाची चौकशी करत दोषींवर कारवाई करण्याचे आश्वासन दिले. या आश्वासनावर गावकऱ्यांनी नमते घेतले. यानंतर शवविच्छेदनाची प्रक्रिया करण्यात आली.
VIDEO : Shirdi Breaking | शिर्डीत स्वच्छतागृहात सापडला मृतदेह https://t.co/zlPLhTxsMc
— TV9 Marathi (@TV9Marathi) June 13, 2020
(Wardha Boy Dies Drowning in Water Tank Dead Body gnawed by Rats)