वर्ध्यात कोरोनाग्रस्त महिलेच्या अंत्यसंस्कारांना उपस्थित 141 जण क्वारंटाईन, 13 गावं सील

| Updated on: May 11, 2020 | 3:38 PM

कोरोनाबाधित मृत महिलेच्या अंत्यविधीला उपस्थित असलेल्या 141 जणांना क्वारंटाईन करण्यात आलं आहे. तर 28 जणांचे नमुने तपासणीसाठी पाठविण्यात आले आहेत.

वर्ध्यात कोरोनाग्रस्त महिलेच्या अंत्यसंस्कारांना उपस्थित 141 जण क्वारंटाईन, 13 गावं सील
Follow us on

वर्धा : आतापर्यंत ग्रीन झोनमध्ये असणाऱ्या वर्धा जिल्ह्यात (Wardha Corona Update) कोरोनाचा शिरकाव होताच जिल्हा प्रशासन अधिक जोमाने कामाला लागले आहे. कोरोना पॉझिटिव्ह मृत महिलेच्या संपर्कात असणाऱ्या नागरिकांना क्वारंटाईन करण्यात आलं आहे. परिसरातील गावागावात आरोग्य तपासणी मोहीम राबविली जात आहे. हिवरा तांडा परिसरात सात किलो मीटर अंतरापर्यंतची सर्व गावं सील करण्यात (Wardha Corona Update) आली आहेत.

कोरोनाबाधित मृत महिलेच्या अंत्यविधीला उपस्थित असलेल्या 141 जणांना क्वारंटाईन करण्यात आलं आहे. तर 28 जणांचे नमुने तपासणीसाठी पाठविण्यात आले आहेत.

आर्वी तालुक्यातील हिवरा तांडा येथील मृत महिलेचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आल्यावर जिल्हा प्रशासनाने कंटेन्मेंट झोन तयार करत गावात घरोघरी आरोग्य तपासणी करण्याची मोहीम सुरु केली. या परिसरात तीन किलो मीटर अंतरावर असणाऱ्या कंटेन्मेंट झोन मधील हिवरा तांडा, हिवरा, जामखुटा, राजनी, हराशीं, बेल्लार, दहेगाव मुस्तफा, बोथली किन्हाळा, बेल्लारा तांडा, पाचोड आदी गावातील 8 हजार 05 नागरिकांना क्वारंटाईन करण्यात आलं आहे. त्यांची आरोग्य तपासणीही (Wardha Corona Update) केली जात आहे.

बफर झोनमध्ये येणाऱ्या 7 किलो मीटर अंतरावरील वाढोना, बेडोना, चिंचोली डांगे, येथील 5 हजार 269 नागरिकांना देखील क्वारंटाईन करण्यात आले आहे. या परिसरात फिवर क्लिनिक सुरु करण्यात आले आहे. नागरिकांच्या आरोग्य तपासणीच्या कामात शिक्षक, आरोग्य सेवक, आशा, आरोग्य सेविका, आशा वर्कर अशी यंत्रणा कामात लागली आहे.

हिवरा तांडा येथील रुग्ण हा आर्वी शहरातील खासगी दवाखान्यात उपचारासाठी गेला होता. तेथील तीन डॉक्टरांनाही क्वारंटाईन करण्यात आले आहे. एवढंच नव्हे, तर आर्वी उपजिल्हा रुग्णालयासह सावंगी रुग्णालयाच्या डॉक्टरांची तपासणी केली जात आहे. आतापर्यंत 28 जणांचे घशाचे स्त्राव घेण्यात आले आहेत. तर 11 जणांना अलगिकरण कक्षात ठेवण्यात आले आहे. मृत महिलेच्या अंत्यसंस्कारासाठी (Wardha Corona Update) उपस्थित असलेल्या 141 जणांना क्वारंटाईन करण्यात आले आहे.

संबंधित बातम्या :

मुंबईतून गावी परतला, घरी न जाता थेट शेतात जाऊन राहिला, तरीही कोरोना पॉझिटिव्ह निघाला

औरंगाबादमध्ये कोरोना रुग्णांचा आकडा वाढताच, रुग्णांची संख्या 600 च्या वर

कोरोनाग्रस्ताच्या अंत्यसंस्कारानंतर पीपीई किट स्मशानभूमीत टाकले, आरोग्य कर्मचाऱ्यांची हलगर्जी

महाराष्ट्रातील कोरोनाबाधित पोलिसांचा आकडा 1 हजार पार, 24 तासात 221 पोलीस पॉझिटिव्ह