वर्धा : कोविड-19 उपाययोजनेअंतर्गत आता जिल्ह्याच्या (Wardha Corona Update) सीमारेषा आणखी कठोर करण्याची गरज असल्याचं चित्र वर्धा जिल्ह्यात आहे. वर्धा जिल्ह्यात गेल्या सात दिवसात रेड झोनमधील तब्बल 250 जणांनी वर्धा जिल्ह्यात प्रवेश केला आहे. आरोग्य सेवक आणि आशा वर्कर्सकडून अशा नागरिकांना हुडकून काढले जात आहे. या लोकांमुळे आरोग्य विभागाची चिंता वाढली आहे. विशेष म्हणजे जिल्ह्यात प्रवेश करण्यासाठी कधी रुग्णवाहिका, तर कधी कांद्याचा ट्रक, तर कधी पायी चालत नागरिक जिल्ह्यात शिरत आहेत. मागील दोन दिवसात जिल्ह्यात सात गुन्हे दाखल झाले आहे, तर दोन रुग्णवाहिका (Wardha Corona Update) जप्त करण्यात आल्या आहेत.
वर्धा जिल्हयात अद्याप एकही कोरोनाबाधित रुग्ण नाही. त्यामुळे ग्रीन झोनमध्ये असणाऱ्या वर्ध्याला कायम ग्रीन झोनमध्येच ठेवण्यासाठी प्रशासन सर्वतोपरी प्रयत्न करीत आहे. पण, जिल्ह्याच्या सीमांवर खबरदारी घेऊनही अनेकजण जिल्ह्यात अवैधरित्या शिरत आहेत. रविवारी दोन जणांनी रुग्णवाहिकेच्या माध्यमातून पुलगाव शहरात पोहोचले, पोलिसांनी या दोघांसह रुग्णवाहिका चालकाला ताब्यात घेण्यात आले आहे. तर आतापर्यंत अशा जिल्ह्यातील अवैध प्रवेशातील दोन रुग्णवाहिका जप्त करण्यात आल्या आहेत. एवढेच नाही तर कांद्याच्या ट्रकचा आसरा घेत अनेकांनी वर्धा गाठले आहे.
कोरोनाचं संकट कायम, लॉकडाऊन कडक करण्याचा निर्णय सर्वस्वी राज्यांचा : पंतप्रधान मोदीhttps://t.co/YORc3oViQk #PMOfIndia #coronavirus
— TV9 Marathi (@TV9Marathi) April 27, 2020
जिल्ह्याला आर्वी, तळेगाव, सेलडोह, पुलगाव, कारंजा अशा विविध गावात इतर जिल्ह्यांना जोडणाऱ्या सीमा आहेत. या सीमा कोविड-19 अंतर्गत सील करण्यात आल्या आहेत. पण, गावखेड्यातून जिल्ह्यात प्रवेश करणारे मार्ग देखील कमी नाहीत. त्यामुळे बाईकने आणि पायी येणाऱ्या नागरिकांचीही कमरतता नाही. कर्नाटक, मुंबई, नागपूर, यवतमाळ, पुणे अशा विविध ठिकाणावरुन नागरिक जिल्ह्यात येत आहेत. जे नागरिक रुग्णवाहिकेने पुलगाव शहरात (Wardha Corona Update) पोहोचले होते त्यांना कोविड केअर सेंटर देवळी येथे ठेवण्यात आले आहे. त्यांना इन्स्टिट्युशनल क्वारंटाईन करण्याचे नियोजन प्रशासनाने केले आहे. पुलगाव शहरात एका दिवसात विविध जिल्ह्यातून आलेल्यांवर आतापर्यंत सहा गुन्हे दाखल करण्यात आले आहे.
इतर जिल्ह्यातून वर्ध्यात प्रवेश केलेल्या अनेकांना होम क्वारंटाईन करण्यात आले होते. पण, जिल्ह्यात येणाऱ्यांच्या संख्येत घट होताना दिसत नाही. त्यामुळे आरोग्य विभागाने अशा नागरिकांना आता होम क्वारंटाईन ऐवजी थेट रुग्णालयात आयसोलेट करण्याचा पवित्रा घेतला आहे. त्याशिवाय ही संख्या थांबणार नाही, असा विश्वास आरोग्य विभागाने व्यक्त केला आहे. बाहेरुन याल तर खबरदार, असे म्हणत प्रशासनाने नागरिकांना तंबी दिली आहे.
वर्धा जिल्हा हा सध्या ग्रीन झोनमध्ये असला, तरी जिल्ह्याच्या आजूबाजूच्या जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात कोरोनाबाधित रुग्ण आहेत. यामुळे जिल्हा प्रशासनाने आता जिल्ह्याच्या सीमा आणखी कठोर करण्याची गरज व्यक्त (Wardha Corona Update) केली जात आहे.
संबंधित बातम्या :
स्पेशल रिपोर्ट : अहमदनगरमधील जामखेड कोरोनाचे हॉटस्पॉट कसं बनलं?
3 मेनंतर लॉकडाऊन काढणार का? गृहमंत्री अनिल देशमुख म्हणतात…
Plasma Therapy : कोरोनामुक्त झालेल्या तब्लिगीकडून प्लाझ्मा डोनेट, मुंबईकर तब्लिगीला पहिला मान