वर्धा : राज्यात कोरोनाचे थैमान सुरु असतानाच ‘सारी’ आजारानेही (Wardha Fights Corona And Sari) डोके वर काढले आहे. कोरोनासोबत राज्यात सारीनेही नागरिकांचा मृत्यू होत आहे. मात्र, वर्ध्यात कोरोना आणि सारी (SARI) या आजाराला रोखण्यात प्रशासनाला यश आले आहे. दिलासादायक बाब म्हणजे जिल्ह्यात अद्याप कोरोनाचा एकही पॉजिटिव्ह रुग्ण आढळलेला नाही, तर सारीचे 65 रुग्ण ठणठणीत झाले आहेत. जिल्ह्यातील सारी या आजारालाही आरोग्य विभागाने हद्दपार केले आहे. एवढेच नाही, तर खबरदारी म्हणून आरोग्य प्रशासनाकडून घरेघरी जाऊन (Wardha Fights Corona And Sari) या दोन्ही आजारांचे सर्वेक्षण केले जात आहे.
कोरोनाशी दोन हात करण्याकरिता जिल्हा प्रशासन मोठ्या प्रमाणात उपाययोजना करत आहे. जिल्ह्यात आतापर्यंत 275 जणांचे नमुने कोरोना चाचणीसाठी पाठवण्यात आले. यापैकी 223 जणांचे अहवाल निगेटिव्ह आले असून 33 लोकांचे अहवाल प्रलंबित आहेत. सोबतच जिल्ह्यात विविध भागातून आलेल्या 1910 जणांना होम क्वारंन्टाईन करण्यात आले आहे. जिल्ह्याच्या आजूबाजूच्या जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात रुग्ण सापडल्याने जिल्ह्याच्या सर्व सीमा बंद करण्यात आल्या आहेत.
दाटीवाटीच्या मालेगावात होम क्वारंटाईन अशक्य, संस्थात्मक क्वारंटाईन करणार : आरोग्य मंत्रीhttps://t.co/A54GqmCEBK
— TV9 Marathi (@TV9Marathi) April 29, 2020
कोरोना संशयितांचे नमुने सुरवातीला नागपूर येथील प्रयोगशाळेत पाठवल्या जात होते. मात्र, जिल्ह्याच्या सेवाग्राम येथील रुग्णालयाच्या प्रयोगशाळेला चाचणीची परवानगी देण्यात आली. यानंतर आरोग्य प्रशासनाने आता गावपातळीवर तपासणीला सुरुवात केली आहे (Wardha Fights Corona And Sari). जिल्ह्यात आरोग्य विभागाकडून 1150 चमू तयार करण्यात आल्या आहेत. प्रत्येक चमूमध्ये 3 सदस्य म्हणजेच 3,450 कर्मचारी कार्यरत आहेत. यात अंगणवाडी सेविका, आशा वर्कर आणि गावातील एका स्वयंसेवकाचा समावेश आहे. आतापर्यंत 1 लाख 88 हजार 412 नागरिकांची तपासणी करण्यात आली आहे.
1,235 नागरिकांमध्ये साधारण सर्दी खोकला असल्याच निदर्शनास आल्याने त्यांच्यावर उपचार करण्यात आले आहेत. तर 65 जणांमध्ये सारी या आजाराची लक्षणं आढळून आली आहेत. सारीची लागण झालेले 65 जण ठणठणीत बरे झाले आहेत.
नागपूर आणि औरंगाबाद सारख्या शहरात सारी या आजाराने थैमान घातले आहे. आधी कोरोना आणि आता सारीमुळे विदर्भ आणि मराठवाड्यावर दुहेरी संकट आहे. वर्धा जिल्ह्यात 65 रुग्णांमध्ये सारीची लक्षणं आढळून आली. त्यांच्यावर आरोग्य विभाग लक्ष ठेऊन होता. सारीची लक्षणं असलेल्या 65 रुग्णांचे थ्रोट स्वॅब नमुने घेण्यात आले. त्यांची तपासणी करण्यात आली. मात्र, सुदैवाने त्यांचा कोरोना अहवाल निगेटिव्ह आला. ग्रामीण रुग्णालय, प्राथमिक आरोग्य केंद्र आणि उपकेंद्रात (Wardha Fights Corona And Sari) अजूनही तपासणी सुरु आहे.
संबंधित बातम्या :
वसई विरारमध्ये दिवसभरात 5 रुग्णांची कोरोनावर मात, 130 पैकी 46 रुग्ण बरे
कोरोनाच्या संकटात गोंडस मुलीला जन्म, 14 दिवसांच्या उपचारानंतर मायलेकीची भेट
दाटीवाटीच्या मालेगावात होम क्वारंटाईन अशक्य, संस्थात्मक क्वारंटाईन करणार : आरोग्य मंत्री
औरंगाबादेत मोठ्या शिताफीने पकडून कोठडीत डांबलं; आरोपी निघाला कोरोना पॉझिटिव्ह; 30 पोलीस क्वारंटाईन