होम क्वारंटाईनचा नियम मोडला, वर्ध्यातील कुटुंबाला 40 हजारांचा दंड

| Updated on: May 29, 2020 | 8:11 PM

आर्वी येथील एका कुटुंबाने नियमांचं उल्लंघन केल्याने त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

होम क्वारंटाईनचा नियम मोडला, वर्ध्यातील कुटुंबाला 40 हजारांचा दंड
Follow us on

वर्धा : लॉकडाऊनमध्ये अडकलेल्या नागरिकांना दिलासा (Wardha Home Quarantine Violation) म्हणून जिल्ह्यात येण्यास परवानगी दिली जात आहे. पण, या काळात बाहेरुन आलेल्या व्यक्तीसह कुटुंबातील सदस्यांना होम क्वारंटाईनमध्ये ठेवण्याचे आदेश आहेत. पण, आर्वी येथील एका कुटुंबाने नियमांचं उल्लंघन केल्याने त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. इतकंच नाही तर या कुटुंबावर तब्बल 40 हजारांचा दंड (Wardha Home Quarantine Violation) ठोठावण्यात आला आहे.

आर्वी येथील सिंधी कॅम्पमधील एका महिलेचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आल्याने परिसरात एकच खळबळ उडाली. त्यानंतर या महिलेच्या कुटुंबियांनी नियमांचे उल्लंघन केल्याचं पुढे आलं. हे लोक क्वारंटाईनमध्ये राहण्याऐवजी सर्रासपणे बाहेर फिरले असल्याचे पुढे आलं. यामुळे त्या कुटुंबावर गुन्हा दाखल करत 40 हजाराचा दंड ठोठावण्यात आला आहे.

आर्वी शहरात अकोला येथून महिला एक महिन्याच्या बाळासह माहेरी आली. यामुळे या कुटुंबाला होम क्वारंटाईन करण्याच्या सूचना देण्यात आल्या. या महिलेचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्यानंतर परिसरात एकच खळबळ उडाली (Wardha Home Quarantine Violation). या कुटुंबातील लोक बाहेर फिरल्याने ते अनेकांच्या संपर्कात आले असल्याची शक्यता आहे.

चार भावंडाचं हे कुटुंब एकाच इमारतीत वास्तव्यास आहेत. त्यांचे व्यवसाय वेगवेगळे असले तरी ते एकाच इमारतीत एकाच घरात राहतात. या भावंडांपैकी एकाची बेकरी आहे. होम क्वारंटाईनचे आदेश असतानाही या व्यक्तीने बेकरी उघडली, उत्पादन केले आणि विक्रीही केली. त्यामुळे ही व्यक्ती अनेकांच्या संपर्कात आल्याची शक्यता आहे.

ही बाब प्रशासनाच्या लक्षात येताच या कुटुंबातील चारही जणांविरुद्ध कलम 188 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला. यासह प्रतिव्यक्ती प्रमाणे 10 हजार म्हणजेच 40 हजाराचा दंड ठोठावण्यात आला आहे. अन्यथा जप्तीची कारवाई करण्यात येईल, असे आदेशसुद्धा देण्यात आले (Wardha Home Quarantine Violation) आहेत.

संबंधित बातम्या :

शेतकऱ्यांसाठी वर्धा जिल्हा प्रशासनाचा अभिनव उपक्रम, कृषी कर्जाच्या कागदपत्रांची फरफट थांबणार

Lockdown : सहा दिवस पायपीट करुन परतलेल्या मजुरांना जंगलात क्वारंटाईन, वाशिममधील ग्रामपंचायतचा प्रताप