PHOTO : निम्न वर्धा प्रकल्पात मनमोहक इंद्रधनुष्याचे दर्शन
वर्ध्या जिल्ह्याच्या आर्वी तालुक्याच्या धानोडी येथील निम्न वर्धा प्रकल्पात देखील असाच इंद्रधनुष्य उभा राहिला आहे.
-
-
पावसाळा म्हटलं की इंद्र धनुष्याचे दर्शन होणारच. पण इंद्र धनुष्याचे सात रंग धरणाच्या पाण्यात आकर्षकपणे उभे राहत असतील, तर असा नजारा मनाला मोहून टाकतो.
-
-
वर्ध्या जिल्ह्याच्या आर्वी तालुक्याच्या धानोडी येथील निम्न वर्धा प्रकल्पात देखील असाच इंद्रधनुष्य उभा राहिला आहे.
-
-
धरणाच्या पाण्यातील ओघ पाहून मन देखील आकर्षित होत आहेत. सततच्या पावसांनंतर आज येथे इंद्रधनुष्याचेच दर्शन झाले.
-
-
निम्न वर्धा प्रकल्प 85.93 टक्के भरला असून प्रकल्पाचे पूर्ण 31 दरवाजे उघडण्यात आले आहे. सध्या प्रकल्पातून 280 क्युसेकचा विसर्ग सुरु आहे.
-
-
धरणातून सुरु असलेल्या विसर्गामुळे नदीच्या पाणीपातळीत वाढ झाली आहे. त्यामुळे नदी काठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.