वर्धा : घरात कोणीच नसल्याची संधी साधून एका चोरट्यांनी जवळपास 38 लाख 46 हजार 500 रुपयांचा ऐवज लंपास केला आहे. वर्धा जिल्ह्यातील हिंगणघाट शहरातील कोठारी कॉमप्लेक्स या ठिकाणी ही घटना घडली. ऐन दिवाळीच्या तोंडावर ही घटना घडल्याने वर्ध्यात खळबळ उडाली आहे. याप्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून सध्या पोलीस याचा तपास करत आहे. (Wardha Theft Stole 38 Lakh)
हिंगणघाट येथील हरीश हुरकट हे पेशाने व्यवसायिक आहेत. काही दिवसांपूर्वी कुटुंबातील एका नातेवाईकाचा मृत्यू झाल्याने ते नागपुरात गेले होते. त्याचवेळी दुपारी दोन जण कोठारी कॉम्प्लेक्स या ठिकाणी दुचाकीवरुन आले. यानंतर त्यांनी लोखंडी दाराची कडी तोडत घरात प्रवेश केला.
त्यानंतर चोरट्यांनी घरातील बेडरुममध्ये असलेल्या कपाटातून जवळपास 700 ग्रॅम सोने, 6 लाख 80 हजाराची डायमंड ज्वेलरी आणि जवळपास दोन किलोच्या घरात चांदी इत्यादी साहित्यावर डल्ला मारला. त्याच्या या सर्व लंपास केलेल्या दागिन्यांची किंमत ही 38 लाख 46 हजार 500 रुपयांहून अधिक आहे.
त्यानंतर हरीश हुरकट यांनी घराची तपासणी करत पोलिसात चोरीची तक्रार दाखल केली आहे. यानंतर वर्ध्यात भर दिवसा ही चोरी झाल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. यानंतर सद्यस्थितीत पोलीस याचा तपास करत आहेत. (Wardha Theft Stole 38 Lakh)
संबंधित बातम्या :
मुलाने नाश्त्याची हातगाडी लावली नाही म्हणून वडिलांची आत्महत्या, थेट नदीपात्रात उडी
एनसीबीनं टाकलेल्या आतापर्यंतच्या धाडीत चार जणांना अटक, 3 लाख 58, 610 रुपये जप्त