नाशिकमधील पावसामुळे औरंगाबादकरांना दिलासा, जायकवाडी धरणाच्या पाणी पातळीत वाढ

| Updated on: Jul 29, 2019 | 5:40 PM

नांदूर मधमेश्वर धरणातून 24 हजार क्यूसेक्सने पाणी सोडण्यात आले आहे. त्यामुळे गोदावरी नदीला अक्षरशः पूर आला आहे. पुराचं हे पाणी औरंगाबाद जिल्ह्यातील कायगाव टोका इथे दाखल झालं आहे. त्यामुळे जायकवाडी धरणाची पाणी पातळी एक टक्क्याने वाढली आहे.

नाशिकमधील पावसामुळे औरंगाबादकरांना दिलासा, जायकवाडी धरणाच्या पाणी पातळीत वाढ
Follow us on

नाशिक : नाशिक शहरासह परिसरात पडत असलेल्या मुसळधार पावसामुळे नांदूर मधमेश्वर धरणातून सोडलेले पाणी जायकवाडी धरणात दाखल झालं आहे. नांदूर मधमेश्वर धरणातून 24 हजार क्यूसेक्सने पाणी सोडण्यात आले आहे. त्यामुळे गोदावरी नदीला अक्षरशः पूर आला आहे. पुराचं हे पाणी औरंगाबाद जिल्ह्यातील कायगाव टोका इथे दाखल झालं आहे. त्यामुळे जायकवाडी धरणाची पाणी पातळी एक टक्क्याने वाढली आहे. त्यामुळे औरंगाबाद शहराच्या पाणी पुरवठ्याचा प्रश्न काही प्रमाणात सुटला आहे. त्यामुळे औरंगाबाद शहरातील नागरिकांनी सुटकेचा निःश्वास सोडला आहे.

नांदूर मधमेश्वर आणि गंगापूर धरणातून सध्या गोदावरी नदी पात्रात पाणी सोडण्यात येत आहे. एका महिन्यांपूर्वी कोरड्या ठाक पडलेल्या गोदावरी नदी पात्राला आणि मृत साठ्यात पोहोचलेल्या जायकवाडी धरणाला या पाण्यामुळे जीवदान मिळालं आहे. 24 हजार क्यूसेक्सने नदी पत्रात कोसळणारे हे पाणी औरंगाबाद कायगाव टोका परिसरात जायकवाडी धरणात मिसळत असतं, या पाण्यामुळे जायकवाडी धरणाच्या मृत पाणीसाठ्यात तब्बल तीन टक्क्यांची वाढ झाली आहे.

गंगापूर आणि नांदूर मधमेश्वर धरणातून सोडलेलं पाणी हे औरंगाबाद जिल्ह्यातल्या कायगाव टोका इथे जायकवाडी धरणात मिळालं. त्यामुळे कायगाव टोका परिसरात जायकवाडी नदी परिसरात अक्षरशः पूरस्थिती निर्माण झाली आहे. नदीच्या परिसरात असलेलं जुनी मंदिरं आणि घाटांपर्यंत या पाण्याचा पातळी वाढली आहे.

मोठ्या प्रमाणात पाण्याचा प्रवाह जायकवाडी धरणात मिसळत असल्यामुळे सध्या जायकवाडी धरणाची पाणी पातळी वाढू लागली आहे. जायकवाडी धरणाची पाणी पातळी ही मृतसाठ्यात गेली होती, उणे 10.7 इतका धरणाचा पाणी साठा कमी झाला होता. पण, त्यात आणखी तीन टक्क्यांची भर पडली असून हा पाणीसाठा आता उणे 7.10 टक्क्यांवर पोहोचला आहे. जायकवाडी धरणावर औरंगाबाद आणि जालना या दोन महानगरांसह चारशे गावांचा पाणीपुरवठा अवलंबून आहे. त्यामुळे या परिसरातील नागरिकांनीही सुटकेचा निःश्वास सोडला आहे.

नाशिक परिसरात कोसळत असलेल्या धुव्वादार पावसामुळे गोदावरी नदीला पूर येऊन जायकवाडी धरणाची पाणी पातळी वाढली असली, तरी मराठवाड्यात अद्यापही समाधानकारक पाऊस झालेला नाही. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये चिंतेचं वातावरण आहे. पण, जायकवाडी धरणाची पाणीपातळी वाढल्याने धरणावर अवलंबून असलेल्या नागरिकांना मात्र दिलासा मिळाला आहे.

संबंधित बातम्या :

पुणेकरांसाठी खूशखबर, खडकवासाला धरण भरले

मुंबई, ठाणे, पुणे आणि नाशिकात अतिवृष्टीचा इशारा

PHOTO : महालक्ष्मी एक्सप्रेस पूराच्या पाण्यात अडकली

केवळ स्पर्श आणि आवाजाची मदत, 450 फूट कातळधार धबधब्यावर अंध ट्रेकरचं यशस्वी रॅपलिंग