पाटणा: खोटं बोलण्याच्या स्पर्धेत आम्ही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची बरोबरी करू शकत नाही. आम्हाला ती गोष्ट जमत नाही, असे वक्तव्य काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी केले. आजपर्यंत काँग्रेसने देशाला दिशा देण्याचे काम केले आहे. काँग्रेसच्या काळात ‘मनरेगा’सारखी योजना सुरु झाली, आम्ही शेतकऱ्यांची कर्जे माफ केली. शेतकऱ्यांच्या पाठिशी कसे उभे राहायचे, रोजगारनिर्मिती कशी करायची किंवा देश कसा चालवायचा हे काँग्रेसला ठाऊक असल्याचा दावा राहुल गांधी यांनी केला. (Rahul Gandhi take a dig on PM Narendra Modi in Bihar)
बिहार विधानसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यातील प्रचारासाठी राहुल गांधी यांनी वाल्मिकीनगर येथे सभा घेतली. यावेळी राहुल गांधी यांनी मोदी सरकारच्या धोरणांवर टीकास्त्र सोडले. आता पंतप्रधान नरेंद्र मोदी तुम्हाला 2 कोटी रोजगारांचे आश्वासन देणार नाहीत. आपण खोटं बोलतोय ही गोष्ट लोकांच्या लक्षात आल्याचे त्यांना समजले आहे. त्यामुळे आता बिहारमधील सभांमध्ये ते 2 कोटी रोजगारांचे आश्वासन देणार नाहीत. काँग्रेसला अशाप्रकारे खोटे बोलायला जमत नाही. खोटं बोलण्याच्या स्पर्धेत आम्ही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी बरोबरी करू शकत नाही, असे राहुल गांधी यांनी सांगितले.
Congress gave direction to the country. We gave MNREGA, waived off farmers’ loans. We know how to run the country, stand with farmers and generate employment, but yes, we do lack one thing – we don’t know how to lie. We cannot compete with him (PM) at lying: Rahul Gandhi https://t.co/AAgU2Jf71V
— ANI (@ANI) October 28, 2020
बिहार विधानसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यातील ७१ मतदारसंघांमध्ये आज मतदान होत आहे. तर दुसरीकडे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राहुल गांधी यांना दुसऱ्या टप्प्यातील प्रचाराचे रणशिंग फुंकले आहे. नरेंद्र मोदी हे दरभंगा, मुजफ्फरपूर आणि पाटण्यात प्रचारसभा घेणार आहेत. तर वाल्मिकीनगर आणि कुशेश्वर येथे राहुल गांधींच्या सभा होतील.
#WATCH: After hearing a person shouting in the crowd, Congress leader Rahul Gandhi asks him, “Did you fry pakoras? You should offer some to Nitish ji and PM ji when they come here next.”#BiharElections pic.twitter.com/72SEdPzaeD
— ANI (@ANI) October 28, 2020
भाजपकडून राहुल गांधींविरोधात निवडणूक आयोगाकडे तक्रार
राहुल गांधी यांनी सकाळी मतदानाला सुरुवात होताना एक ट्विट केले होते. यामध्ये त्यांनी मतदारांना न्याय, रोजगार आणि शेतकरी-कामगारांसाठी महाआघाडीला मतदान करण्याची मागणी केली. ‘इस बार न्याय, रोजगार, किसार-मजदूर के लिए आपका वोट सिर्फ महागठबंधन के लिए. बिहार के पहले चरण के मतदान की आप सभी को शुभकामनाएँ’ असे राहुल यांनी ट्विटमध्ये म्हटले होते.
मात्र, मतदानाच्यादिवशी एखाद्या पक्षाला मतदान करा असं सांगून राहुल गांधी यांनी आचारसंहितेचा भंग केला आहे. त्यामुळे राहुल गांधी यांच्याविरोधात कायदेशीर कारवाई करण्याची मागणी भाजपने निवडणूक आयोगाकडे केली आहे.
संबंधित बातम्या:
पुढच्या वेळी मोदी-नितीश कुमार आले तर त्यांना पकौडे खायला घाला, राहुल गांधींचा निशाणा
राहुल गांधी यांच्याविरुद्ध निवडणूक आयोगाकडे तक्रार, आचारसंहिता भंगाचा भाजपचा आरोप
Bihar Election 2020 : तोंडाला मास्क, हातात ग्लोव्हज, बिहार निवडणुकीच्या मतदानाचे काही फोटो
(Rahul Gandhi take a dig on PM Narendra Modi in Bihar)