मुंबई : हिंद महासागर आणि दक्षिणेकडील अरबी समुद्रात वाऱ्याच्या चक्रकार स्थितीमुळे (Rain In Maharashtra) महाराष्ट्रातील अनेक ठिकाणी जोरदार पावसाने हजेरी लावली आहे. ऐन हिवाळ्यात पावसाने एन्ट्री घेतल्याने नागरिकांची तारांबळ उडाली आहे. मात्र, असे वातावरण पुढचे काही दिवस राहणार असून ढगाळ वातावरणासह अनेक ठिकाणी पाऊस होणार असल्याचा अंदाज हवामान खात्याकडून वर्तवण्यात आला आहे (Rain In Maharashtra).
राज्यात अचानक पावसाने हजेरी लावल्याने बळीराज्याची धाकधुक वाढली आहे. अवेळी पावसामुळे रब्बी पिकांना पुन्हा फटका बसला आहे. राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये जोरदार पावसाने हजेरी लावली. त्यामुळे अनेक ठिकाणी पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. पुढचे काही दिवस असेच वातावरण असणार असल्याचं हवामान खात्याकडून सांगण्यात आल्याने शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे.
Kolhapur rains since evening today, 4/1
Shared by my friend @shanpati from Klp in weather group.
Thnx. pic.twitter.com/2sRy4vhSob— K S Hosalikar (@Hosalikar_KS) January 4, 2021
मुंबई वेधशाळेचे प्रमुख डॉ. के. एस. होसाळीकर यांनी दिलेल्या माहितीनुसार आगामी 6 ते 7 जानेवारीदरम्यान पावसाची शक्यता आहे. त्याची चाहुल काल मुंबईत लागली. होसाळीकर यांनी सांगितल्याप्रमाणे कालपासून राज्याच्या काही भागात ढगाळ वातावरण निर्माण झाले होते. तर मुंबईमध्ये सकाळी काही ठिकाणी हलक्या तसेच रिमझिम स्वरुपाचा पाऊस पाडला. मुंबईत थंडीचे प्रमाणही कमी झाले आहे.
Cloudy sky over parts of Mah today morning, 4 Jan, as seen from latest satellite image.
Light rains, drizzle reported at isol places, including Mumbai early morning hrs. Partly cloudy sky@RMC_Mumbai pic.twitter.com/0gs7TyR2ki— K S Hosalikar (@Hosalikar_KS) January 4, 2021
लासलगावात काल दिवसभर ढगाळ वातावरण होते. मात्र मध्यरात्री 2 वाजेच्या सुमारास अचानक पावसाने हजेरी लावली. पाच ते सात मिनिटे झालेल्या पावसाने काढणीला आलेल्या द्राक्ष ,कांदा , हरभरे तसेच गहू पिकाला फटका बसण्याच्या शक्यता आहे. त्यामुळे बळीराजाच्या चिंतेत वाढ झाली आहे. शेतातील काढून ठेवलेला कांदा भिजल्याने कांद्याच्या बाजार भावावर परिणाम होत आर्थिक फटका बसण्याची भीती व्यक्त केली जात आहे (Rain In Maharashtra).
शहापूरमध्ये रात्री 2 वाजून 25 मिनिटाने अचानक पावसाच्या जोरदार सरी बरसल्या. 4 ते 5 मिनिटे सतत पाऊस पडला त्यामुळे हवेत गारवा निर्माण झाला आहे.
राज्यात 6 ते 7 जानेवारीला कोकण, गोवा, मध्य महाराष्ट्रात हलक्या सरींच्या पावसाचा अंदाज हवामान खात्यानं वर्तवला आहे. तसेच महाराष्ट्रातील किमान तापमानात (Maharashtra Temperature) येत्या 3 ते 4 दिवसांत घट होण्याची शक्यता आहे. विशेष म्हणजे राज्यासह संपूर्ण उत्तर भारतात मोठ्या प्रमाणात थंडी पडली आहे. संपूर्ण उत्तर भारत थंडीमुळे गारठला आहे (Rain In Maharashtra).
संबंधित बातम्या :
Weather Alert : पुढचे काही दिवस राज्यासाठी महत्त्वाचे, हवामान खात्याकडून मुसळधार पावसाचा इशारा
weather alert | पश्चिमी वाऱ्यामुळे राज्यात ढगाळ वातावरण, मुंबईत पावसाच्या हलक्या सरी
Weather Alert | एकीकडे हाडं फोडणारी थंडी, त्यात पावसाळ्यासारखा मुसळधार, महाराष्ट्रात काय होणार?