मुंबई : लढवय्या अभिनेता इरफान खान यांचं वयाच्या 54 व्या वर्षी निधन (Irrfan Khan Neuroendocrine tumor) झालं. इरफान खानवर मुंबईतील कोकिलाबेन रुग्णालयात उपचार सुरु होते. काल मंगळवारी त्याची प्रकृती बिघडल्याने त्यांच्यावर आयसीयूमध्ये उपचार सुरु होते. मात्र कॅन्सरशी झुंज देणाऱ्या या अभिनेत्याची झुंज आज अपयशी ठरली. त्याने उपचारादरम्यान आज रुग्णालयात अखेरचा श्वास घेतला.
‘लाईफ इन अ मेट्रो’, ‘पानसिंग तोमर’, ‘द लंच बॉक्स’, ‘हैदर’, ‘गुंडे’, ‘पिकू’, ‘तलवार’, ‘हिंदी मीडियम’ यांसारख्या चित्रपटांमध्ये त्याने दमदार भूमिका साकारल्या होत्या. (Irrfan Khan Neuroendocrine tumor)
इरफान खान रुग्णालयात
अभिनेता इरफान खानला काल रुग्णालयात दाखल केलं होतं. कॅन्सरशी झुंज देऊन लंडनमध्ये उपचार घेऊन इरफान भारतात परतला होता. त्याच्यावर मागील अनेक दिवसांपासून उपचार सुरु होते. मात्र, काल (28 एप्रिल) सकाळी त्याची तब्येत अचनाक बिघडली (Irrfan Khan admitted in ICU due to Cancer). यानंतर त्याला मुंबईतील कोकिळा बेन रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यांची प्रकृती गंभीर असल्यानं त्यांना आयसीयूमध्ये दाखल करण्यात आलं होतं. उपचारादरम्यान, इरफानने रुग्णालयात अखेरचा श्वास घेतला.
इरफानला न्यूरोअँडोक्राइन ट्यूमर
इरफान खानने दोन वर्षापूर्वी मार्च महिन्यात ट्वीट करत आपल्या आजाराबद्दलची माहिती चाहत्यांना दिली होती. त्यात म्हटलं होत की, “मला न्यूरोअँडोक्राइन ट्यूमर झाला आहे. यातून मी एक गोष्ट शिकलो की, अचानक सामोरे येणाऱ्या गोष्टी आपल्याला आयुष्यात पुढे घेऊन जातात. मला जेव्हा कळलं मला न्यूरोअँडोक्राइन ट्यूमर झाला आहे, तेव्हा मला ते सहन झालं नाही. मात्र आजूबाजूच्या लोकांचे प्रेम आणि इच्छाशक्तीमुळे मला बळ मिळालं आहे. त्यामुळे उपचार घेऊन लवकरच परतेन.”
इरफान खानला झालेला न्यूरोअँडोक्राइन ट्यूमर नेमका काय?
…तेव्हा इरफानने स्वत:च माहिती दिली होती
2 वर्षांपूर्वी मार्च 2018 मध्ये इरफानला कॅन्सर झाल्याचं स्पष्ट झालं होतं. त्याने स्वतः ही धक्कादायक बातमी दिली होती. त्याने ट्वीट करत म्हटले होते, “आयुष्यात अचानक काही अशा घटना होतात ज्यामुळे आयुष्य तुम्हाला खूप पुढे घेऊन जातं. माझ्या आयुष्यात मागील काही दिवसांपासून असंच काहीसं घडत आहे. मला न्यूरो एन्डोक्राईन ट्यूमर नावाचा आजार झाला आहे. मात्र, आजूबाजूच्या लोकांच्या प्रेमाने आणि शक्तीने मला नवी आशा मिळाली आहे.
इरफान खानला न्यूरोएन्डोक्राईन ट्यूमर झाला होता. त्यावरच त्याचे उपचार सुरु होते. लॉकडाऊनमुळे लागू असलेल्या निर्बंधांमुळे त्याच्या या नियमित उपचारांमध्ये अडथळा येत होता. त्यामुळेच त्याला रुग्णालयात दाखल केल्याची माहिती त्याच्या निकटवर्तीयांनी दिली आहे.
दरम्यान, नुकतेच इरफान खानच्या आई सईदा बेगम यांचं निधन झालं होतं. त्यावेळी लॉकडाऊनमुळे त्याला आईच्या अंत्यसंस्कारासाठीही जाता आले नसल्याचंही वृत्त होतं. त्यावेळी इरफानने व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे आईचं अंतिम दर्शन घेतलं होतं.
कोण होता इरफान खान?
संबंधित बातम्या
Irrfan Khan | इरफान खान यांचे निधन, बॉलिवूडपासून हॉलिवूडपर्यंत प्रवास
Irrfan Khan | पानसिंग तोमर ते लाईफ ऑफ पाय, इरफान खानचे गाजलेले चित्रपट