कुंभ आणि महाकुंभ मेळाव्यात फरक काय? किती प्रकारचे कुंभ मेळे असतात?

| Updated on: Jan 12, 2025 | 8:08 PM

महाकुंभ मेळावा यंदा उत्तर प्रदेशातील प्रयागराज येथील गंगा, यमुना आणि सरस्वती नदीच्या संगमावर १३ जानेवारीपासून भरणार आहे. या महाकुंभ मेळाव्याला ४० कोटीहून अधिक भाविक आणि साधूसंत भेट देणार आहेत.

कुंभ आणि महाकुंभ मेळाव्यात फरक काय? किती प्रकारचे कुंभ मेळे असतात?
Follow us on

हिंदू धर्मीयांचा धार्मिक सोहळा असलेला महाकुंभ मेळावा यंदा उत्तर प्रदेशातील प्रयागराज येथे भरणार आहे. या महाकुंभ मेळाव्यात जगभरातील श्रद्धाळू येत आहेत. परंतू तुम्हाला माहिती आहे का कुंभ मेळ्याचे किती प्रकार असतात. या कुंभ मेळाव्यात कोट्यवधी भाविक आणि गंगेच्या पाण्यात स्नान करुन पापांपासून मुक्ती मिळवतात. या मेळाव्यात हजारो सांधूचे जणू संमेलनच भरत असते. महाकुंभ मेळावा १२ वर्षांतून एकदा विशिष्ट स्थानी भरत असतो. या मेळाव्यात हजारो साधूसंतासह भाविक देखील पवित्र स्नान करीत असतात. त्यामुळे पापांपासून मुक्ती मिळून मोक्ष प्राप्ती होते अशी श्रद्धा आहे.

कुंभ मेळे किती प्रकारचे असतात ?

कुंभमेळ्याचे चार विविध प्रकार आहेत. पूर्ण कुंभ, अर्ध कुंभ, कुंभमेळा आणि महा (महान) कुंभमेळा असे चार प्रकार आहेत.  कुंभमेळा हा दर तीन वर्षांनी भरत असतो तर महाकुंभमेळा दर १२ वर्षांनी एकदा भरतो आणि हा महाकुंभ मेळा सर्वात दुर्मिळ आणि पवित्र मानला जातो. यंदाचा महाकुंभ मेळावा हा १३ जानेवारी २०२५ ते २६ फेब्रुवारी २०२५ दरम्यान उत्तर प्रदेशातील प्रयागराज येथे होणार आहे. कुंभ मेळा आणि महाकुंभ मेळा हा हिंदूधर्मातील सर्वात मोठा धार्मिक मेळावा आहे. या मेळाव्यात लाखो हिंदू बांधव मोठ्या श्रद्धेने सहभागी होत असतात आणि पापांपासून मुक्ती मिळवित मोक्ष प्राप्त करतात.

हे सुद्धा वाचा

कुंभ आणि महाकुंभ मेळा म्हणजे काय ?

कुंभमेळा दर तीन वर्षांनी चार पवित्र ठिकाणी आयोजित करण्यात येतो. हरिद्वार, उज्जैन, नाशिक आणि प्रयागराज येथील पवित्र स्थानांवरील नद्यांमध्ये डुबकी मारून भाविक पापांपासून मुक्ती मिळवितात आणि मोक्ष प्राप्त करतात. महाकुंभ मेळावा दर १२ वर्षांनी आयोजित करण्यात येत असून हा महाकुंभ मेळावा उत्तर प्रदेशातील प्रयागराज येथील गंगा, यमुना आणि सरस्वती नदीच्या संगमावर आयोजित करण्यात येतो. यंदाचा महाकुंभ मेळावा येत्या १३ जानेवारी आणि २६ फेब्रुवारी २०२५ दरम्यान आयोजित करण्यात आला आहे. .