मुंबई | 11 जानेवारी 2024 : जगातील सर्वात शक्तीशाली पासपोर्टची यादी जाहीर झाली आहे. हेनले पासपोर्ट इंडेक्स 2024 ( Henley Passport Index 2024 ) च्या यादीत यंदाही पहिल्या क्रमांकावर सिंगापूर आणि जपानचे पासपोर्ट आहेत. पासपोर्टमुळे आपल्याला किती देशात व्हीसा शिवाय प्रवेश दिला जातो त्यावर त्या पासपोर्टची क्षमता समजते. या हेनले पासपोर्ट इंडेक्स 2024 च्या यादीत भारतीय पासपोर्ट 80 व्या स्थानावर आहे. भारतीय पासपोर्ट धारक विना व्हीसा 62 देशांचा प्रवास करु शकतात. भारताच्या सोबत 80 व्या स्थानावर उज्बेकिस्तानचा देखील समावेश आहे. तर पाकिस्तानच्या पासपोर्ट 101 क्रमांकावर आहे.
हेनले पासपोर्ट इंडेक्समध्ये सिंगापूर आणि जपानच्या पासपोर्टचा क्रमांक गेल्यावर्षी प्रमाणे यंदाही पहिल्या क्रमांकावर आहे. गेली पाच वर्षे हेनले इंडेक्समध्ये हेच पासपोर्ट शक्तीशाली बनले आहेत. परंतू यंदा थोडा बदल झाला आहे. यंदा पहिल्या क्रमांकावर सिंगापूर आणि जपानबरोबर फ्रान्स, जर्मनी, इटली आणि स्पेन या चार अन्य युरोपीय देशांचा क्रमांक लागला आहे. हे पासपोर्ट असलेल्यांना सिंगापूर आणि जपानप्रमाणे 227 डेस्टीनेशन पैकी 194 डेस्टीनेशनला व्हीसा फ्री एन्ट्री आहे. हेनले पासपोर्ट इंडेक्समध्ये दुसऱ्या क्रमांकावर अमेरिका सोबत दक्षिण कोरिया, स्वीडन आणि फिनलॅंड हे देश आहेत. या देशाचा पासपोर्ट असणारे 193 डेस्टीनेशनवर व्हीसा शिवाय जाऊ शकतात. ब्लूमबर्गच्या अहवालानूसार ऑस्ट्रीया, डेनमार्क,आयरलॅंड आणि नेदरलॅंड संयुक्त रुपात तिसऱ्या क्रमांकावर आहेत. या देशाचे पासपोर्ट धारक 192 देशांचा व्हीसा मुक्त प्रवास करु शकतात.
या यादीत सर्वात अधिक प्रगती आखाती देश संयुक्त अरब अमिराती ( युएई) ने केली आहे. गेल्या हेनले इंडेक्स यादी हा देश 14 व्या क्रमांकावर होता. आता युएईचा पासपोर्ट 11 व्या क्रमांकाचा सर्वात शक्तीशाली पासपोर्ट बनला आहे. युएईचा पासपोर्ट धारक व्हीसा शिवाय 182 डेस्टीनेशनवर जाऊ शकतो. यंदा चीनचे स्थान दोन अंकाने वर आले आहे. आता चीनची रॅकींग 62 झाली आहे. चीनचे पासपोर्ट धारकांना 85 देशांत विना व्हीसा एन्ट्री मिळू शकते. गेल्या दहा वर्षांच्या तुलनेत दुप्पट प्रगती झाली आहे.
2024 च्या टॉप 10 शक्तिशाली पासपोर्टची यादी
1. फ्रान्स, जर्मनी, इटली, जापान, सिंगापूर, स्पेन (194 डेस्टीनेशन )
2. फिनलॅंड, दक्षिण कोरिया, स्वीडन (193 डेस्टीनेशन )
3. ऑस्ट्रिया, डेनमार्क, आयरलॅंड, नीदरलॅंड (192 डेस्टीनेशन )
4. बेल्जियम, लक्ज़मबर्ग, नॉर्वे, पोर्तुगाल, यूनायटेड किंगडम (193 डेस्टीनेशन )
5. ग्रीस, माल्टा, स्विट्जरलॅंड (190 डेस्टीनेशन )
6. चेक गणराज्य, न्यूजीलॅंड, पोलॅंड (189 डेस्टीनेशन )
7. कॅनडा, हंगेरी, अमेरिका (188 डेस्टीनेशन )
8. एस्टोनिया, लिथुआनिया (187 डेस्टीनेशन )
9. लातविया, स्लोवाकिया, स्लोवेनिया (186 डेस्टीनेशन )
10. आइसलॅंड (185 डेस्टीनेशन)
नवीन वर्षांच्या सुरुवातीला नागरिकता वित्तीय सल्लागार फर्म आर्टन कॅपिटलने 2024 च्या पहिल्या तिमाहीसाठी पासपोर्ट इंडेक्स जारी केला होता. या इंडेक्समध्ये युएईच्या पासपोर्टला सर्वात शक्तीशाली पासपोर्ट म्हटले होते. पासपोर्टचा मोबिलिटी स्कोर 180 होता म्हणजे या पासपोर्टवर 180 देशात व्हीसा फ्रि एन्ट्री होती. या यादीत भारताची रॅंकींग 66 वी होती. भारताच्या पासपोर्टचा मोबिलिटी स्कोर 77 आहे. या यादीत पाकिस्तान 47 मोबिलीटी स्कोरसोबत सर्वात कमी श्रेणीवाल्या देशांमध्ये होता.