मुंबई : वजन वाढल्यानंतर आपल्याला अनेकांकडून ग्रीन टी पिण्याचा सल्ला दिला जातो. विशेष म्हणजे ग्रीन टी हे पाण्यानंतर जगभरातील सर्वात प्रसिद्ध पेय पदार्थ बनलं आहे. ग्रीन टी मध्ये न्यूट्रिशन आणि अँटीऑक्सिडेंट घटक असतात. ज्यामुळे शरीरातील वाढलेले वजन आटोक्यात येते आणि लठ्ठपणा कमी होतो. तसेच ग्रीन टी ही तुमच्या त्वचेसाठीही उत्तम मानली जाते. मात्र काही जण दर दोन तासाला ग्रीन टी पितात. ज्यामुळे त्यांच्या शरीरावर हानी होऊ शकते.
आपल्या शरीरात मेटाबॉलिज्म नावाचे एक घटक असतो. जो आपण काहीही खाल्ल्यानंतर किंवा प्यायल्यानंतर त्याचे रुपांतर ताकदीत करण्यासाठी शरीराला मदत करतो. ग्रीन टी मधील घटक शरीरातील मेटाबॉलिज्म घटकाला वाढवतात. त्यामुळे शरीरातील वजन कमी होते. पण वजन कमी करण्यासाठी ग्रीन टी सोबतच नियमित व्यायामही गरजेचा असतो. निरोगी राहण्यासाठी नियमित व्यायामासोबतच, फळ, पालेभाज्या यांचे सेवन करणे गरजेचे आहे. तसेच यासोबतच ग्रीन टी चे सेवन केल्याने तुमचे वजन लवकर कमी होईल असा सल्ला तज्ज्ञांनी दिला आहे.
पण ग्रीन टी तुम्ही अतिप्रमाणात घेतली तर ती शरीरासाठी हानिकारक ठरते. युनिव्हर्सिटी ऑफ मेरीलँडच्या मेडीकल सेंटरच्या एका अभ्यासानुसार, वजन कमी करण्यासाठी दिवसातून केवळ 2 वेळाच ग्रीन टी पिणे योग्य आहे. तसेच यापेक्षा जास्त ग्रीन टी पिणे आरोग्यासाठी धोकादायक ठरु शकते.
कधी प्यावा ग्रीन टी ?
जर तुम्ही वजन कमी करण्यासाठी पित असाल तर नाश्ता किंवा जेवणानंतर ग्रीन टी प्या. त्यामुळे तुमच्या शरीराला लगेचच त्याचा फायदा होईल. तसेच तुमचे पोट जर खूप सेनस्टिव्ह असेल तरच असे करा. कारण त्यामुळे नेचर अल्कालाइन होते. त्याशिवाय दररोज सकाळी एक कप आणि संध्याकाळी एक कपच ग्रीन टी चे सेवन करा.
अशी तयार करा ग्रीन टी?
ग्रीन टी तयार करण्यासाठी पाण्याला खूप जास्त गरम करु नका. त्यामुळे त्यात आवश्यक जीवनसत्त्व नष्ट होतात. चांगल्या परिणामांसाठी तुम्ही पाणी गरम करुन 10 मिनीटे तसेच ठेवा. त्यानंतर ग्रीन टीचे पॅकेट कपात घेऊन त्यावर गरम पाणी टाका आणि 1 मिनीटे तसेच ठेवा. ग्रीन टी आणि पाणी एकत्रित झाल्यानंतर प्या.