रशिया (russia) आणि युक्रेनचं (ukraine) युद्ध (war) सुरू झाल्यापासून दोन्ही देशांकडे असलेल्या अनेक शस्त्रांची चर्चा होती. तसेच कोणत्या पद्धतीने रशियाने युक्रेनवरती हल्ला केला आहे याच्यावर अनेकांचं बारकाईने लक्ष होतं. युक्रेनमधून हल्ला झाल्यानंतरचे अनेक व्हिडीओ बाहेर आले त्यामध्ये रशियाने आत्तापर्यंत अनेक महत्त्वाच्या ठिकाणी बॉम्ब हल्ला केल्याचे व्हिडीओच्या माध्यमातून पाहायला मिळाले आहे. त्यामुळे ज्या देशातून शस्त्र खरेदी केली जाते त्या देशातील शस्त्रांच्या किमतीत वाढ झाली आहे. नुकतेचं जर्मनीने आपले संरक्षण बजेट दुप्पट केले आहे. इटली, नेदरलँड आणि स्पेन हे देश बजेट वाढवण्यची शक्यता आहे. युक्रेनवरती इतका भयानक हल्ला करून देखील अमेरिका आणि नाटो देशाने रशियावर अद्याप हल्ला न केल्याने अनेकांना आच्छर्य वाटले आहे. परंतु रशियाकडे सर्वात मोठी अणुशक्ती हे कारण आहे. त्यामुळे इतर देशांनी रशियाला कसल्याही प्रकारचं उत्तर दिलेलं नाही.
या पाच देशांचा बाजारपेठेत अधिक वाटा
अमेरिका, रशिया, फ्रान्स, जर्मनी आणि चीन हे जगातील असे पाच देश आहेत. ज्यांचा जगातील शस्त्रास्त्र बाजारपेठेतील 75 टक्के वाटा आहे.त्यामुळं आता या देशातील शस्त्रांच्या किमतीत मोठ्या प्रमाणात वाढ होण्याची शक्यता आहे.
सगळ्यात जास्त शस्त्र विक्री अमेरिकेतून
सगळ्यात जास्त शस्त्र विकण्यात अमेरिका देश आघाडीवर आहे. आत्तापर्यंत अमेरिकेने त्याच्याकडील 37 टक्क्यांहून अधिक शस्त्रे विकली आहेत. दुस-या क्रमाकांवर रशिया आहे, त्यांनी आत्तापर्यंत 20 टक्के विक्री केली आहे. 8.3 टक्के व्रिकी करणारा तिस-या क्रमांकावर फ्रान्स आहे. तर जर्मनी ५.५ टक्क्यांसह चौथ्या स्थानावर आहे. चीन 5 व्या क्रमांकावर आहे असून त्यांचा वाटा 5.2 टक्के आहे.
पाच सर्वात मोठे शस्त्र खरेदीदार
सौदी अरेबिया, भारत, इजिप्त, ऑस्ट्रेलिया आणि चीन हे जगातील पाच सर्वात मोठे शस्त्र खरेदी करणारे देश आहेत असा अहवाल स्टॉकहोम इंटरनॅशनल पीस रिसर्च इन्स्टिट्यूट म्हणजेच SIPRI यांनी जाहीर केला आहे. हा अहवाल 2021 साली जाहीर करण्यात आला होता.
भारत दुसरा सर्वात मोठा खरेदीदार
सौदी अरेबिया 11 टक्के, भारत 9.5 टक्के, इजिप्त 5.8 टक्के, ऑस्ट्रेलिया 5.1 टक्के आणि चीन 4.7 टक्के अशी जागतिक बाजारातील आकडेवारी आहे.
चीनचे खरेदी-विक्रीचे सूत्र वेगळे आहे
सर्वाधिक शस्त्रे विकणाऱ्या आणि सर्वाधिक शस्त्रे खरेदी करणाऱ्या देशांच्या यादीत चीन हा एकमेव देश आहे. तज्ज्ञांच्या मते चीन रिव्हर्स इंजिनीअरिंग फॉर्म्युलावर काम करतो. म्हणजेच आधी तो शस्त्रे खरेदी करतो. मग तो त्याच्या गरजेनुसार त्या शस्त्रांमध्ये काही बदल करतो आणि नंतर ती इतर देशांना विकतो.
भारत रशियाकडून सर्वाधिक शस्त्रे घेतो
भारताला लागणारी अनेक शस्त्र भारत रशियाकडून खरेदी करतो. भारत रशियाकडून 23 टक्के, चीन 18 टक्के आणि अल्जेरियाकडून 15 टक्के शस्त्रास्त्रे खरेदी करतो.त्यामुळे भारत रशियाकडून सर्वाधिक शस्त्रे घेतो. त्यामुळे भारताने रशियाला उघडपणे विरोध केलेला नाही.
या कारणामुळे अमेरिका बाजारपेठ वाढवत आहे
अमेरिकेची बाजारपेठ काही टक्क्यांनी वाढली असून रशियाची बाजारपेठ काही टक्क्यांनी कमी झाली आहे. SIPRI अहवालानुसार ही माहिती देत आहोत.
या देशांकडून भारत शस्त्रे घेतो
रशियाशिवाय भारत अमेरिका, इस्रायल आणि फ्रान्सकडूनही शस्त्रे खरेदी करतो, त्यामुळे भारत ना रशियाला उघड विरोध दर्शवू शकतो ना अमेरिकेच्या विरोधात उभा राहू शकतो. त्यामुळे आत्तापर्यंत यु्द्धाच्या पार्श्वभूमीवर भारत शांत आहे.