Who Is Syed Shuja मुंबई: ईव्हीएम हॅकिंगच्या माहितीमुळे भाजप नेते गोपीनाथ मुंडे यांची हत्या झाली, या अमेरिकन सायबर एक्स्पर्ट सय्यद शुजाच्या (Syed Shuja) दाव्याने देशभरात खळबळ उडाली आहे. सय्यद शुजाने सोमवारी लंडनमध्ये व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे हा खळबळजनक आरोप केला. इतकंच नाही तर भाजपने 2014 मध्ये रिलायन्सच्या मदतीने ईव्हीएम हॅक करुन विजय मिळवल्याचा दावा शुजाने केला. शुजाच्या मते गोपीनाथ मुंडेच नव्हे तर ज्येष्ठ पत्रकार गौरी लंकेश यांचीही हत्या याच कारणामुळे झाली. शुजाच्या दाव्यांमुळे एकच खळबळ उडाली आहे. मात्र हा दावा करणारा सय्यद शुजा आहे तरी कोण, हा प्रश्न सर्वांना पडला आहे.
कोण आहे सय्यद शुजा?
सय्यद शुजा हा एक सायबर सिक्युरिटी रिसर्चर आहे. तो मूळचा हैदराबादचा रहिवासी आहे. सध्या तो नोकरीनिमित्त अमेरिकेत राहतो.
सय्यद शुजाच्या दाव्यानुसार, तो भारतात मतदानासाठी बनवण्यात येणाऱ्या ईव्हीएम मशीनच्या टीमचा सदस्य होता.
शुजाच्या मते, तो ECIL अर्थात भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेडमध्ये काम करत होता.
शुजाने दावा केला आहे की, 2014 मध्ये त्याच्या टीमला कोणत्याही परिस्थितीत ईव्हीएम हॅक करण्यास बजावलं होतं. त्याच्या टीमने ईव्हीएम हॅक केलं, तेव्हा हैदराबादमध्ये त्यांच्यावर जीवघेणा हल्ला झाला, या हल्ल्यात शुजा बचावला मात्र त्याचे सहकारी मारले गेले, असाही दावा शुजाने केला.
सय्यद शुजाने केलेल्या या दाव्यांमध्ये तथ्य आहे की नाही हे येत्या काळात समोर येतं का ते पाहावं लागेल.
सय्यद शुजाचे नेमके दावे काय?
अमेरिकन सायबर एक्स्पर्ट सय्यद शुजा असं या एक्स्पर्टचं नाव आहे, त्याने लंडनमध्ये दावा केला आहे की, 2014 च्या निवडणुकीत भाजप नेते गोपीनाथ मुंडे यांना ईव्हीएम हॅकिंग माहित होतं, त्यामुळेच त्यांची हत्या झाली. लोकसभा निवडणुकीत ईव्हीएम हॅक केलं होतं. 14 लोकांच्या टीमने हे काम केलं होतं. त्यापैकी काहींची हत्या झाल्याचाही दावा अमेरिकेच्या एक्स्पर्टने लंडनमध्ये केला आहे.
संबंधित बातम्या
EVM हॅकिंगच्या माहितीमुळेच गोपीनाथ मुंडेंची हत्या, अमेरिकन एक्स्पर्टचा दावा
गोपीनाथ मुंडेंच्या मृत्यूची सुप्रीम कोर्टाच्या न्यायमूर्तींकडून चौकशी व्हावी : भुजबळ