वर्धा : दारुच्या जाचाला कंटाळून पत्नीने पतीची हत्या केल्याची घटना केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. वर्ध्यातील समुद्रपूर तालुक्यातील वायगाव (गोंड) या ठिकाणी ही घटना घडली. मुरलीधर नथ्थू पिजकाटे (52) असे मृत व्यक्तीचे नाव आहे. तर नंदा मुरलीधर पिचकाटे असे आरोपी पत्नीचे नाव आहे. (Wardha Wife Killed Husband due to over Alcohol drinking)
मुरलीधर हा नेहमीच दारु पिऊन घरी आल्यानंतर कुटुंबियांना शिवीगाळ करत असे. तसेच त्याच्या पत्नीला मारहाण करत असे. त्यामुळे पत्नी नंदा पिजकाटे ही पतीच्या जाचाला कंटाळली होती.
सोमवारी रात्री मुरलीधरने दारु पिऊन नंदाला मारहाण केली. यावेळी नंदाला राग अनावर झाला. तिने जवळच असलेल्या काठीने मुरलीधरवर वार केले. त्यामुळे मुरलीधर पलंगावर पडला. त्यानंतर नंदाने पुन्हा काठीने वार केला. त्यामुळे त्याचा जागीच मृत्यू झाला.
या घटनेची माहिती मुरलीधर याचा भाचा स्वप्नील घोडे याने पोलीस नियंत्रण कक्षाला फोन करून माहिती दिली. ही माहिती मिळताच समुद्रपूर पोलीस घटनास्थळी पोहोचले. त्यांनी पंचनामा करुन तिचा मृतदेह हिंगणघाट येथील उपजिल्हा रुग्णालयात पाठविले. आरोपी पत्नी नंदा पिजकाटे हिला अटक केली आहे. पुढील तपास समुद्रपूर पोलीस करत आहेत. (Wardha Wife Killed Husband due to over Alcohol drinking)
संबंधित बातम्या :
पत्नीला माहेरी पाठवल्याचा राग, पुणे रेल्वे पोलिसात असलेल्या मेहुणीवर कुऱ्हाडीने हल्ला
मित्राची हत्या, हत्येनंतर कल्याण क्राईम ब्रांच ऑफिससमोर पान विक्री, पोलिसांनी शिताफीने छडा लावला