चंद्रपूर : एरवी महिलांच्या कौटुंबिक वादाच्या अदखलपात्र तक्रारी पोलिस महिला तक्रार निवारण केंद्रात पाठवितात. मात्र, रामनगर पोलीस ठाण्यात एका व्यक्तीने केलेली तक्रार याला अपवाद ठरली आहे (Wife Tortured Husband). चार दिवसांपूर्वी रामनगर पोलीस ठाणे हद्दीतील एका पुरुषाने आपली कैफीयत थेट पोलीस ठाण्यात येऊन मांडली. पत्नी शारिरीक सुखासाठी त्रास देते अशी तक्रार एका पुरुषाने पोलिसात केली आहे (Wife Tortured Husband).
तक्रारकर्त्या संबंधित पुरुषाचे पाच वर्षांपूर्वी लग्न झाले. या दाम्पत्याला मुलंही झाली. मात्र, मागील काही महिन्यांपासून पत्नी त्रास देत आहे. पत्नीला अपेक्षेपेक्षा जास्त शारिरीक सुख हवे. त्यामुळे ती मला त्रास देत आहे, अशी तक्रार या पुरुषाने केली आहे. या लेखी तक्रारीवर कोणता गुन्हा दाखल करावा, यासाठी पोलिसांनी कायद्यांच्या पुस्तकांचा पडशा पाडला. मात्र, त्यांनाही गुन्हा दाखल करण्यासाठी योग्य कलमा अद्याप मिळालेल्या नाही.
अखेर हे प्रकरण महिला तक्रार निवारण केंद्राकडे पाठविण्यात आले आहे. विशेष म्हणजे कौटुंबिक वादाच्या तक्रारी या महिला तक्रार निवारण केंद्राकडे पाठविल्या जातात. मात्र, या पुरुषाने केलेली तक्रारीही येथे पाठविण्यात आली आहे. त्यामुळे सध्या या प्रकरणाची संपूर्ण शहरात चर्चा होत आहे.