गिरिडीह | 4 मार्च 2024 : “मी जड अंतःकरणाने तुमच्यासमोर उभी आहे. माझे सासरे आणि सासू काळजीत आहेत. मला वाटत होते की मी माझ्या अश्रूंवर नियंत्रण ठेवू शकेन. पण, तुमचे प्रेम बघून मला माझे अश्रू आवरता आले नाहीत. तुम्ही इथून त्यांना हाक मारा. इतक्या जोरात सांगा की तुमचा आवाज, तुमचा उत्साह तुमच्या दादांपर्यंत पोहोचला पाहिजे. राज्यात महाआघाडीचे सरकार आल्यापासून केंद्राकडून षडयंत्र रचले जात आहे. तुम्ही काहीही कराल असे तुम्हाला वाटत असेल तर तुमची चूक ठरत आहात. आम्ही कधीही झुकलो नाही झुकणारही नाही, अशा शब्दात माजी मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांच्या पत्नी कल्पना सोरेन यांनी मोदी सरकारवर हल्लाबोल केलाय.
झारखंडचे माजी मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांच्या पत्नी कल्पना सोरेन यांनी गिरिडीहमध्ये झारखंड मुक्ती मोर्चा (जेएमएम) च्या 51 व्या स्थापनादिन सोहळ्याला उपस्थिती लावली. या सोहळ्याच्या माध्यमातून त्यांनी राजकीय जीवनाला सुरुवात केली. यावेळी त्यांनी भावपूर्ण भाषण केले.
‘हेमंत सोरेन आणि कल्पना यांचा सर्व सभेला जोहर’, अशी भाषणाची सुरवात करून त्या म्हणाल्या, येथील प्रत्येकाने त्यांना इतक्या जोराने हक मारा की तो आवाज तुमचे दादापर्यंत (हेमंत सोरेन) पोहोचला पाहिजे. आज हेमंत सोरेन तुरुंगात आहेत. त्यांच्याविरोधात मोठा कट रचला गेला. पण, काहीही झाले तरी झारखंडी कधीही झुकणार नाही हे लक्षात ठेवा असा इशारा त्यांनी दिला.
केंद्राने हेमंत यांच्या निमित्ताने झारखंडवासीयांचा अपमान करण्याचा प्रयत्न केला. पण, पक्षाचे कार्याध्यक्ष हेमंत सोरेन यांनी त्यांच्यापुढे न झुकण्याचा निर्णय घेतला. ते तुरुंगात गेले. रविवारी माझ्या वाढदिवशी मी पतीला भेटण्यासाठी होतवार तुरुंगात गेले होते. त्यांनी माझ्या खांद्यावर हात ठेवला आणि घाबरू नकोस असे सांगितले. त्यांना तुरुंगात पाठवण्यात आले आहे. पण, तो अजूनही जिवंत आहे. केंद्राने केलेल्या चुकीची शिक्षा व्हायलाच हवी. त्यासाठी आपणाला एक एक मत हेमंत सोरेन यांच्या पक्षालाच द्यायचे आहे असे आवाहनही कल्पना सोरेन यांनी केले.
“दिल्लीतील लोकांची ह्रदये धडधडत नाहीत. आदिवासी, दलितांसोबत आपण काहीही करू शकतो, असं त्यांना वाटतं. मुख्यमंत्र्यांना पायउतार होण्यास त्यांनी भाग पाडलं. पण, येथील आमच्या सर्व कार्यकर्त्यांच्या मनोधैर्यावरून असं वाटतं की आम्ही त्यांचा पराभव केला. येत्या काळात तुम्ही सर्वांनी मिळून त्या आशीर्वादाचे मतांमध्ये रूपांतर करायचे आहे आणि झारखंडी कधीच झुकणार नाही, हे त्यांना ठणकावून सांगू.” असे कल्पना सोरेन यावेळी म्हणाल्या.
कल्पना यांनी रविवारीच X (ट्विटर) वर सक्रिय राजकारणात प्रवेश करण्याची घोषणा केली होती. हेमंत सोरेन यांचे सोशल मीडिया प्लॅटफॉर्म X चे हँडल सध्या त्याच चालवत आहेत. सोशल मीडियावर त्यांनी गुरू शिबू सोरेन आणि रुपी सोरेन यांच्यासोबत एक फोटो शेअर केला आहे. आपल्या संदेशात त्यांनी #झारखंड झुकणार नाही असा टॅगही लावला आहे. त्याखाली कल्पना यांनी “मला विश्वास आहे की तुम्ही तुमच्या मुलाला आणि भाऊ हेमंतजींना जे प्रेम आणि आशीर्वाद दिलेत, तेच प्रेम आणि आशीर्वाद तुम्ही मला म्हणजेच हेमंत जीच्या जीवनसाथीलाही द्याल”, असे लिहिले आहे.
कल्पना यांनी राजकीय जीवनात प्रवेश केल्याने पक्षाचे नेते खूश झाले आहेत. कल्पना यांच्यामुळे पक्ष निश्चितच मजबूत होईल, असे आमदार सुदिव्य कुमार म्हणाले. तर, आमच्या नेत्याला कट रचून तुरुंगात पाठवण्यात आले आहे. आता कल्पना यांच्या राजकीय जीवनात प्रवेश झाल्याने सर्व कार्यकर्त्यांमध्ये नवा उत्साह संचारला आहे असे काही कार्यकर्त्यानी म्हटले आहे.