पुण्याहून यवतमाळ येथे पायी निघालेल्या महिलेची नगरजवळ ATM च्या आडोशाला प्रसुती

| Updated on: Apr 20, 2020 | 5:55 PM

पत्नी गरोदर असल्यामुळे पुणे येथून एक मजूर आपल्या कुटुंबासह पुण्याहून यवतमाळ येथे पायी जाण्यास (Women delivery in ATM center) निघाला.

पुण्याहून यवतमाळ येथे पायी निघालेल्या महिलेची नगरजवळ ATM च्या आडोशाला प्रसुती
Follow us on

अहमदनगर : पत्नी गरोदर असल्यामुळे एक मजूर आपल्या कुटुंबासह पुण्याहून यवतमाळ येथे पायी जाण्यास (Women delivery in ATM center) निघाला. याच दरम्यान त्याच्या गरोदर पत्नीला प्रसुती कळा जाणवू लागल्याने सदर महिलेची प्रसुती एका एटीएममध्ये करण्याची वेळ एका कुटूंबावर आली. ही घटना अहमदनगरमधील नेवासा तालुक्यातील वडाळा बहिरोबा येथे घडली. या महिलेची सुखरुप प्रसुती झाली असून तिला कन्यारत्न प्राप्त झाला (Women delivery in ATM center) आहे.

पुणे येथील वाघोली येथे दोन वर्षापासून आदिवासी समाजातील संदीप विठ्ठल काळे आणि पत्नी निर्मला रोजंदारीचे काम करत होते. लॉकडाऊनमुळे कामधंदा नसल्याने संदीप पत्नी निर्मला आणि तिन वर्षाची मुलगी आरती, बहीण पंचफुला आणि मेव्हणा कैलास घंगाडे हे सर्व यवतमाळला पायी चालत निघाले होते. याच दरम्यान नेवासा येथे आल्यानंतर महिलेला प्रसुती कळा जाणावायल्या लागल्या.

महिलेला प्रसुती कळा जाणवू लागल्याने या परिस्थीत वडाळ्याचे उपसरपंच राहुल मोटे, आधार प्रतिष्ठाणचे अध्यक्ष जयवंत मोटे यांनी त्यांची अडचण लक्षात घेवून तातडीने ग्रामस्थ लता उनावळेच्या मदतीने महिलेस बँक ऑफ बडोदाच्या इमारतीमध्ये आसरा दिला. येथे आरोग्य उपकेंद्राच्या परिचारिका सोनाली न्यालपेल्ली आणि वनीता काळे यांनी प्रसुती केली.

“या महिलेस कन्यारत्न झाले असून मायलेकी दोघेही सुखरुप आहे”, असं परिचारीका सोनाली न्यायपेल्ली यांनी सांगितले.