महिला आज पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून काम करीत आहेत. महिलांच्या सशक्तीकरणासाठी अनेक योजना सरकार काढत आहेत. आता महिलांकडून घरांची खरेदी वाढण्यासाठी महाराष्ट्राच्या CREDAI-MCHI ने खास पाऊल उचलले आहे. या संस्थेने मुंबईत भरलेल्या प्रॉपर्टी मेळाव्यात महिलांच्या द्वारे होणाऱ्या घर खरेदीवर दोन लाख रुपयांची अतिरिक्त सूट दिली आहे. ही ऑफर पिंक संडे मोहिमेचा एक भाग आहे. या ऑफरमध्ये बांधकाम व्यावसायिकांकडून दिलेल्या सुविधांमध्ये आणखी वाढ होणार आहे. ही ऑफर केवळ रविवारच्या खरेदीवर दिलेली आहेय हे प्रदर्शन १७ ते १९ जानेवारी दरम्यान आहे. जिओ वर्ल्ड कन्व्हेन्शन सेंटर मध्ये हे प्रदर्शन भरविण्यात आले आहे.
येथे पाहा पोस्ट –
We congratulate our Mahayuti Govt for creating history in Maharashtra and are inspired by their vision of Togetherness & Inclusivity.
✨ CREDAI MCHI – The Mall of Homes, 2025 ✨
Get ready for the Biggest Sale in Real Estate History!🗓️ 17th to 19th January 2025
📍 JWCC, BKC pic.twitter.com/P4KUwUyaWg— CREDAI_MCHI (@MCHI_President) November 26, 2024
हा प्रॉपर्टी एक्स्पोमध्ये घर खरेदी सोपी करण्यात आली आहे. ज्यात तुम्ही अगदी दहा मिनिटांत घर बुक करु शकता अशी स्कीम्स आम्ही आणली असल्याचे प्रॉपर्टी मेळाव्याचे आयोजक CREDAI-MCHI चे अध्यक्ष डोमिनिक रोमेल यांनी म्हटले आहे. एक्स्पोच्या मदतीने घर खरेदी सोपी बनली आहे. मुळात प्रदर्शन भरविण्याचा उद्देश्यच घर खरेदी सोपी करणे आणि हवे ते हव्या त्या बजेट घर घेता यावे असा असल्याचे क्रेडाई नेशनल के अध्यक्ष बोमन इराणी यांनी म्हटले आहे. यात रिअल इस्टेटमधील इनोव्हेशनवर देखील लक्ष ठेवण्यात आले आहे.
या प्रदशनात घरे खरेदी करणाऱ्यांसाठी खास ऑफर देखील देण्यात आली आहे. ज्यात स्टँप्ट ड्युटी आणि जीएसटी पासून सूट आणि १८ लाखांपर्यंत विशेष सवलत देण्यात येणार असल्याचे CREDAI-MCHI चे सचिव धवल अजमेरा यांनी म्हटले आहे.
या प्रदर्शनात प्रथमच १९ जानेवारी रोजी ‘पिंक संडे’नावाने खास दिवस साजरा केला जात आहे. ज्या महिलांना स्वत:च्या नावाने घर खरेदी करायची असेल तर त्यांना प्रोत्साहन देण्यासाठी ही योजना आखली आहे. या CREDAI-MCHI महिला निवास योजनेंतर्गत महिलांना दोन लाखांची अतिरिक्त सूट दिली आहे.