मुंबई : जगभरातील 218 देशांमध्ये गेल्या 24 तासांमध्ये 6.66 लाख नवे कोरोनाबाधित रुग्ण (Corona-infected patients) आढळले आहेत. त्यामुळे कोरोना संक्रमितांची एकूण संख्या 6.62 कोटींच्याही पुढे गेली आहे. तसेच गेल्या 24 तासात जगभरात 12 हजारांहून अधिक कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला आहे. गेल्या आठवड्याभरापासून दररोज 11 हजारांहून अधिक कोरोनाबाधितांचा बळी जात आहे. यापैकी सर्वाधिक मृत्यू अमेरिकेत नोंदवण्यात आले आहेत. (world Coronavirus cases and Deaths report 4 december 2020)
वर्ल्डोमीटर या वेबसाईटने दिलेल्या माहितीनुसार आतापर्यंत जगभरात 6 कोटी 62 लाख 11 हजार 27 कोरोनाबाधितांची नोंद करण्यात आली आहे. त्यापैकी 4 कोटी 57 लाख 97 हजार 676 रुग्ण बरे झाले आहेत, तर 15 लाख 23 हजार 556 बाधितांचा मृत्यू झाला आहे. जगभरात सध्या 1 कोटी 88 लाख 89 हजार 795 सक्रिय कोरोनाबाधित रुग्ण आहेत.
आतापर्यंत सर्वाधिक कोरोनाबाधित रुग्ण अमेरिकेत आढळले आहेत. अमेरीकेत 1 कोटी 47 लाख 72 हजार 535 कोरोनाबाधितांची नोंद करण्यात आली आहे. त्यापैकी 86 लाख 58 हजार 882 रुग्ण बरे झाले आहेत, तर 2 लाख 85 हजार 550 बाधितांचा मृत्यू झाला आहे. सर्वाधिक कोरोनाबाधितांच्या बाबतीत भारत दुसऱ्या नंबरवर आहे. भारतात आतापर्यंत 96 लाख 8 हजार 418 कोरोनाबाधितांची नोंद करण्यात आली आहे. त्यापैकी 90 लाख 58 हजार 3 रुग्ण बरे झाले आहेत, तर 1 लाख 39 हजार 736 बाधितांचा मृत्यू झाला आहे. भारतातील कोरोनाबाधितांबाबतची ही आकडेवारी आरोग्य मंत्रालयाने दिली आहे.
सर्वाधिक कोरोनाबाधित रुग्ण आढळलेले टॉप 10 देश
अमेरिका : एकूण कोरोनाबाधित – 14,772,535, मृत्यू – 285,550
भारत : एकूण कोरोनाबाधित – 9,608,418, मृत्यू – 139,736
ब्रझील : एकूण कोरोनाबाधित – 6,534,951, मृत्यू – 175,981
रशिया : एकूण कोरोनाबाधित – 2,402,949, मृत्यू – 42,176
फ्रान्स : एकूण कोरोनाबाधित – 2,268,552, मृत्यू – 54,767
स्पेन : एकूण कोरोनाबाधित – 1,699,145, मृत्यू – 46,252
यूके : एकूण कोरोनाबाधित – 1,690,432, मृत्यू – 60,617
इटली : एकूण कोरोनाबाधित – 1,688,939 , मृत्यू – 58,852
अर्जेंटिना : एकूण कोरोनाबाधित – 1,454,631, मृत्यू – 39,512
कोलंबिया : एकूण कोरोनाबाधित – 1,352,607, मृत्यू – 37,467
भारतातील पहिली कोरोना लस दृष्टीपथात : पंतप्रधान
भारतासह जगभरात कोरोनाग्रस्तांची संख्या वाढत आहे. अनेक देशांमध्ये कोरोनाची दुसरी लाट आली आहे. अशा परिस्थितीत कोरोनावरील लसीकडे संपूर्ण जगाचे लक्ष लागले आहे. दरम्यान, “कोरोना विषाणूवरील भारतातील पहिली वहिली लस (Corona Vaccine) दृष्टीपथात आली आहे. काही आठवड्यातच कोरोना वॅक्सिन तयार होईल. सर्वसामान्य नागरिकांचा विचार करुन लशीची किंमत निश्चित करण्यात येईल”, अशी माहिती पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी दिली. अवघ्या काही आठवड्यात लसीकरण मोहिम सुरु करणार असल्याचेही संकेत त्यांनी दिले.
देशातील कोरोना रुग्णांची वाढती संख्या आणि कोरोना लस या विषयावर आयोजित सर्वपक्षीय बैठकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी शुक्रवारी (4 डिसेंबर 2020) सहभागी झाले होते. तज्ज्ञांच्या माहितीनुसार आपल्याला कोरोना लशीसाठी फार काळ वाट पाहावी लागणार नाही, असं नरेंद्र मोदी बैठकीत म्हणाले. मी यापूर्वी सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांशी चर्चा केली आहे. लस उत्पादनाच्या संदर्भात देशात काय तयारी आहे, याचा आढावा घेतला. वेगवेगळ्या टप्प्यावर 8 लसींची चाचणी सुरु आहे, असंही नरेंद्र मोदी म्हणाले. त्यामुळे जवळपास वर्षभरापासून लसीच्या प्रतीक्षेत असलेल्या भारताच्या नागरिकांना दिलासा मिळणार आहे.
संबंधित बातम्या
कोरोना लस कधी येणार? किंमत काय? सगळ्यात आधी कुणाला टोचणार? कोरोना लशीची A to Z माहिती
30 नोव्हेंबरपर्यंत भारताकडे कोरोना लसीचे सर्वाधिक डोस, आतापर्यंत 1.6 अब्ज डोसचा करार!
(world Coronavirus cases and Deaths report 4 december 2020)