नवी दिल्ली : जागतिक आरोग्य संघटनेचे (World Health Organization) प्रमुख टेडरोस अदनोम घेबियस (Tedros Adhanom Ghebreyesus) यांनी स्वतःला क्वारन्टाईन केले आहे. गेल्या काही दिवसात त्यांच्या संपर्कात आलेल्या एका व्यक्तीचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आल्याने टेडरोस यांनी होम क्वारन्टाईन होण्याचा निर्णय घेतला आहे. टेडरोस यांनी याबाबत ट्विटरद्वारे माहिती दिली आहे. (World Health Organization Tedros Adhanom Ghebreyesus self quarantine after contact with someone who tested corona positive)
टेडरोस यांनी ट्विटमध्ये म्हटलं आहे की, सध्या त्यांच्यात कोरोनाची कोणतीही लक्षणं नाहीत, तसेच ते सध्या पूर्णपणे स्वस्थ आहेत. परंतु WHO च्या प्रोटोकॉलप्रमाणे ते घरुनच काम करणार आहेत. यासोबत त्यांनी म्हटलं आहे की, क्वारन्टाईन होऊन कोरोनाची चैन तोडता येईल. ज्यामुळे आपण कोरोनाला हरवू शकतो.
I have been identified as a contact of someone who has tested positive for #COVID19. I am well and without symptoms but will self-quarantine over the coming days, in line with @WHO protocols, and work from home.
— Tedros Adhanom Ghebreyesus (@DrTedros) November 1, 2020
जगभरात कोरोनाबाधितांची संख्या सातत्याने वाढत आहे. एकूण बाधितांची संख्या 4,68,04,423 इतकी झाली आहे. यापैकी 12,05,044 लोकांना त्यांचा जीव गमवावा लागला आहे. तर 3,37,42,731 लोकांनी कोरोनावर मात केली आहे. कोरोनाबाधितांच्या संख्येच्या बाबतीत भारत जगात दुसऱ्या स्थानावर आहे. भारतात आतापर्यंत 82,29,322 कोरोनाबाधितांची नोंद करण्यात आली आहे. यापैकी 1,22,642 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तर 75,42,905 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. सध्या देशात 5,63,775 अॅक्टिव्ह कोरोनाबाधित रुग्ण आहेत.
My @WHO colleagues and I will continue to engage with partners in solidarity to save lives and protect the vulnerable. Together!
— Tedros Adhanom Ghebreyesus (@DrTedros) November 1, 2020
फ्रान्स-जर्मनीपाठोपाठ इंग्लंडमध्येही पुन्हा लॉकडाऊन, कोरोनाबाधितांची संख्या 10 लाखांच्या पुढे
कोरोना विषाणू (Corona Virus) संसर्गाच्या दुसऱ्या लाटेमध्ये कोरोनाबाधित रुग्णांची संख्या वाढल्यामुळे युरोपातील (Europe) देशांमध्ये पुन्हा लॉकडाऊन जाहीर करण्यात आला आहे. जर्मनीमध्ये कोरोनामुळे मृत्यू होणाऱ्या रुग्णांच्या संख्येत 40 वाढ झाल्यामुळे 2 नोव्हेंबरपासून लाॉकडाऊनची (lockdown) कडकपणे अंमलबजावणी करण्यात येणार आहे. फ्रान्समध्ये शुक्रवारपासून लॉकडाऊन लागू करण्यात आला आहे. स्पेनमध्येही यापूर्वीच लॉकडाऊनची घोषणा करण्यात आली आहे. या देशांपाठोपाठ आता इंग्लंडमध्येदेखील पुन्हा लॉकडाऊन घोषित करण्यात आला आहे. ब्रिटिश पंतप्रधान बोरिस जॉनसन यांनी शनिवारी कडक लॉकडाऊनची घोषणा करत सर्व नियमांचे काटेकोरपणे पालन करण्याचे आवाहन केले आहे.
यूकेमध्ये (UK) कोरोना संक्रमित रुग्णांची संख्या 1 मिलियन (10 लाख) होताच पीएम जॉनसन यांनी अचानक लॉकडाऊनची घोषणा केली. यावेळी त्यांनी सांगितले की, आता व्यापार (Business) आणि देनंदिन जीवनावर (Daily Life) कडक नियम लावण्यात आले आहेत. हा लॉकडाऊन गुरुवारी सुरु होईल आणि 2 डिसेंबरपर्यंत लागू असेल.
संबंधित बातम्या
ट्रम्प यांच्या 18 रॅलीतील 30 हजाराहून अधिक सहभागींना कोरोना, 700 जणांचा मृत्यू : अहवाल
सावधान! कोरोना पुन्हा वाढतोय, अनेक देश पुन्हा लॉकडाऊनच्या तयारीत
(World Health Organization Tedros Adhanom Ghebreyesus self quarantine after contact with someone who tested corona positive)