रायगड : 27 सप्टेंबर हा दिवस जागतिक पर्यटन दिन म्हणून सर्वत्र साजरा केला जातो (Diveagar Beach Cleaning Campaign). त्यामुळे आजच्या जागतिक पर्यटन दिनाचे औचित्य साधून महाराष्ट्रातील प्रसिद्ध पर्यटन स्थळ असलेल्या श्रीवर्धन तालुक्यातील दिवेआगर समुद्रकिनारी स्वच्छता मोहीम राबविण्यात आली. दिवेआगर पर्यटन विकास मंडळ आणि दिवेआगर ग्रामस्थांच्या सहभागातून दिवेआगरच्या समुद्रकिनाऱ्याची स्वच्छता करण्यात आली (Diveagar Beach Cleaning Campaign).
कोरोनाच्या संकटामुळे गेले 7 महिने पर्यटन पूर्णतः बंद आहे. त्यामुळे इथल्या व्यावसायिकांचा रोजगार बुडाला आहे. तसेच किनाऱ्यावर पर्यटकांची आणि ग्रामस्थांचीही रेलचेल नाही परंतु असे असले तरीही किनाऱ्यावर अनेक ठिकाणी अस्वच्छता असल्याचे दिसून आले.
याचे कारण म्हणजे समुद्राच्या लाटांसोबत प्लास्टिकच्या पिशव्या, कागदाचे तुकडे, टाकाऊ वस्तू असे अनेक घटक किनाऱ्यावर आले आहेत. त्यामुळे दिवेआगरचा समुद्रकिनारा सदैव स्वच्छ आणि नैसर्गिकदृष्ट्या अबाधित राहावा या सामाजिक बांधिलकीतून आणि समुद्रकिनाऱ्याचे जतन व्हावे या जाणिवेतून ही स्वच्छता मोहीम राबविण्यात आली असल्याचे इथले ग्रामस्थ सांगतात.
का साजरा केला जातो पर्यटन दिवस?
जागतिक पर्यटन दिवसाची सुरुवात 1970 पासून संयुक्त राष्ट्राच्या जागतिक पर्यटन संस्थेद्वारे केली गेली. 27 सप्टेंबर 1980 रोजी पहिला जागतिक पर्यटन दिन साजरा करण्यात आला. पर्यटनाचा प्रचार व प्रसार व्हावा यासाठी आजच्या दिवशी जगभर विविध कार्यक्रम आयोजित केले जातात. नवनवीन ठिकाणी भेट देणं, स्थानिक गोष्टींची माहिती जाणून घेण्याची उत्सुकता पर्यटन क्षेत्राला प्रोत्साहन देते.
World Tourism Day | जागतिक पर्यटन दिन का साजरा करतात? यंदाची संकल्पना काय?https://t.co/rp3bRN9TDQ #WorldTourismDay #WorldTourismDay2020
— TV9 Marathi (@TV9Marathi) September 27, 2020
Diveagar Beach Cleaning Campaign
संबंधित बातम्या :
‘कोरोना’चा फटका, देशात बेरोजगारीचे प्रमाण 27.11 टक्क्यांवर, महाराष्ट्रात किती?