२०२४ हे वर्ष संपण्यासाठी अवघे काही दिवस राहिलेले आहेत. थोड्याच दिवसात नवीन वर्ष २०२५ आगमन होणार असून लोक नवीन वर्षाची आतुरतेने वाट पाहत आहेत. येत्या नवीन वर्षाच्या जल्लोषाचे नियोजनही लोकांनी आधीपासूनच सुरू केले आहे. नववर्षाच्या स्वागतासाठी सुट्ट्यांचे प्लॅनिंग करून आपापली आवडती ठिकाणं सापडली आहेत. पण तुम्हाला माहित आहे का की यावर्षी म्हणजे २०२४ मध्ये जगातील टॉप अशी कोणती ट्रॅव्हल डेस्टिनेशन लोकांच्या पसंतीचा भाग बनली? चला तर मग जाणून घेऊयात
अमेरिकेची सर्वेक्षण संस्था YouGov ने जगभरातील टॉप पर्यटनस्थळांची यादी तयार केली आहे. YouGov ही एक ऑनलाइन सर्व्हे एजन्सी आहे, ज्याच्या माध्यमातून जगातील अनेक देशांचे लोकं सर्वेक्षणात भाग घेतात. चला जाणून घेऊया जगातील सर्वात आवडत्या ठिकाणांमध्ये भारतातील कोणती पर्यटन स्थळे आहेत.
नॅचरल हिस्ट्री म्युजियम हे खूप प्रसिद्ध म्युजियम आहे. येथे लोकांना हे म्युजियम बघायला खूप आवडते. लंडन आणि अमेरिका वगळता इतर ही अनेक ठिकाणी हे म्युझियम आहे. विशेष म्हणजे यात पृथ्वीच्या 4.6 अब्ज वर्षांचा इतिहास सांगितला आहे. पण त्यात इतिहासाबरोबरच पुढील १०० वर्षांचे भवितव्यही दाखवण्यात आले आहे.
नायग्रा धबधबा हा उत्तर अमेरिकेतील तीन धबधब्यांचा समूह आहे. हा धबधबा कॅनडा आणि न्यूयॉर्कच्या सीमेवर आहे. १६० फूट उंचीवरून कोसळणारा हा धबधबा पाहण्यासाठी जगभरातून लोक येथे येतात.
स्कॉटलंडचा ऐतिहासिक एडिनबर्ग कॅसल जगभरात प्रसिद्ध आहे. दगड कापून हा शाही राजवाडा तयार करण्यात आला होता. एडिनबर्ग कॅसल १६३३ पर्यंत एक शाही राजवाडा होता, परंतु त्यानंतर १७ व्या शतकात तो केवळ राहण्यासाठी वापरला जाऊ लागला.
लंडनमधील या प्रसिद्ध टॉवरबद्दल कोणाला माहिती नसेल असे होऊच शकत नाही. या टॉवरचा इतिहास बराच जुना मानला जातो. याची स्थापना १०६६ मध्ये झाली असे मानले जाते. इ.स. ११०० ते १९५२ या काळात या टॉवरचा तुरुंग म्हणून वापर करण्यात आला.
ब्रिटनच्या या म्युझियममध्ये तुम्हाला फक्त दगड दिसतील. या संग्रहालयात मोकळ्या आकाशाखाली सुमारे २५ टन मोठे दगड ठेवण्यात आले आहेत. इथेही जगभरातून पर्यटक खूप फिरायला येत असत.
YouGov च्या 2024 च्या तिसऱ्या तिमाहीच्या अहवालात भारतातील कोणत्याही ठिकाणाचे नाव टॉप 10 पर्यटन स्थळांमध्ये नाही, परंतु 50 लोकप्रिय पर्यटन स्थळांमध्ये ताजमहाल 31 व्या स्थानावर आहे.