महाराष्ट्रात एकही बालक पोषण आहारापासून वंचित राहणार नाही : यशोमती ठाकूर

| Updated on: Apr 15, 2020 | 10:41 PM

एकही बालक, गर्भवती माता, स्तनदा माता पोषण आहारापासून वंचित राहणार नाही, असं आश्वासन महिला व बालविकास मंत्री ॲड. यशोमती ठाकूर यांनी दिलं आहे (Yashomati Thakur brief on Nutrition Food for Childrens).

महाराष्ट्रात एकही बालक पोषण आहारापासून वंचित राहणार नाही : यशोमती ठाकूर
Follow us on

मुंबई : अंगणवाडी सेविकांच्यामार्फत वितरीत केला जाणारा घरपोच पोषण आहार (टीएचआर) येत्या आठवडाभरात सर्व बालकापर्यंत पोहोचवला जाईल. एकही बालक, गर्भवती माता, स्तनदा माता पोषण आहारापासून वंचित राहणार नाही, असं आश्वासन महिला व बालविकास मंत्री ॲड. यशोमती ठाकूर यांनी दिलं आहे (Yashomati Thakur brief on Nutrition Food for Childrens). त्या आज राज्यातील आढावा घेतल्यानंतर बोलत होत्या. त्यांनी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे अधिकाऱ्यांशी संवाद करत कामाची माहिती घेतली. यावेळी त्यांनी पोषण आहार पुरवठा, अंगणवाडी सेविकांचे मानधन, बाल संस्थांसाठीचे अनुदान वितरण आदींबाबत आढावा घेतला.

यशोमती ठाकूर म्हणाल्या, “3 ते 6 वयोगटातील बालकांना अंगणवाडीमध्ये गरम ताजा आहार (हॉट कुक्ड मील- एचसीएम) दिला जातो. परंतु, कोरोना प्रसाराच्या पार्श्वभूमीवर बालकांना अंगणवाडीमध्ये न बोलावता त्यांच्या घरीच एचसीएमऐवजी घरपोच पोषण आहार (टीएचआर) देण्याचा निर्णय घेतला आहे. या वयोगटातील बालकांसाठीचे घरपोच पोषण आहाराचे जिल्हास्तरावर वितरणाची कार्यवाही सुरू आहे. 20 एप्रिल 2020 पूर्वी सर्व राज्यभरात वितरीत केला जाईल याची खात्री करावी, असे निर्देशही दिले आहेत.”


कोरोना प्रसाराच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊननंतर पोषण आहार पुरवठ्यामध्ये काही अंशी अडचणी उद्भवल्या होत्या. भारतीय अन्नधान्य महामंडळामार्फत पोषण आहारांतर्गतचे धान्य उपलब्ध झाले होते. लॉकडाऊनमुळे हे धान्य वाहनात भरण्यासाठी कामगार उपलब्ध नसल्याने आणि धान्याच्या वाहतुकीमध्ये अडथळा निर्माण झाला होता. ॲड. ठाकूर यांनी सर्व संबंधित यंत्रणांशी चर्चा करुन पोषण आहाराच्या धान्याची उचल आणि वाहतुकीचे निर्देश दिले आहेत. त्यानुसार धान्य उपलब्ध होण्याची कार्यवाही सुरु झाली आहे. सर्व जिल्ह्यात हे धान्य पोहोचले आहे. एप्रिल आणि मे 2020 साठी गर्भवती माता, स्तनदा माता तसेच 6 महिने ते 3 वर्षे वयोगटातील बालकांसाठीचा घरपोच पोषण आहार (टेक होम रेशन-टीएचआर) नियमित पद्धतीनुसार वितरीत करण्यात आला आहे, असी माहिती यशोमती ठाकूर यांनी दिली.

यशोमती ठाकूर म्हणाल्या, “अंगणवाडी पर्यवेक्षिका, अंगणवाडी सेविका, मदतनीस खूप चांगल्या पद्धतीने काम करत आहेत. घरोघरी जाऊन कोरोनाबाबत जनजागृतीचे काम केले जात आहे. महिला व बालविकास विभाग त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभा असल्याचे त्यांनी आश्वस्त केले. अंगणवाडी सेविका, मदतनीस यांचे मानधन आणि बाल संस्थांसाठीच्या अनुदान वितरणाबाबतही शासनस्तरावर सकारात्मक कार्यवाही सुरु आहे.”

यावेळी सचिव आय. ए. कुंदन, महिला व बालविकास आयुक्त डॉ. ऋषिकेश यशोद, एकात्मिक बालविकास योजना आयुक्त इंद्रा मालो व्हिडिओ कॉन्फरन्सवर उपस्थित होत्या. घरपोच पोषण आहार वेळेत पोहोचण्यासाठी ॲड. ठाकूर यांनी संबंधितांना निर्देश दिले.

संबंधित बातम्या :

Maharashtra corona update | रुग्णांची संख्या 3 हजारांजवळ, कुठे किती कोरोना रुग्ण?

पुण्यात लॉकडाऊनमध्ये सिगारेट विकणाऱ्या व्यापाऱ्यावर कारवाई, 39 लाखाचे सिगारेट जप्त

देशभरात 1,344 जणांची कोरोनावर मात, 10,197 रुग्णांवर उपचार सुरु, केंद्रीय आरोग्य मंत्रालयाची माहिती

‘महापुरात आम्हाला वाचवलं, महामारीत तुम्हाला वाचवू’, महापुरात बुडालेल्या चिखलीकरांची सरकारला मदत

भारतात वटवाघळामुळे कोरोना पसरला का? ICMR चे मराठमोळे संशोधक म्हणतात…..

कोरोना चाचणीच्या सक्तीने गरोदर महिला, डायलेसिस, केमोथेरपीसारख्या उपचारांना अडथळा : देवेंद्र फडणवीस

Yashomati Thakur brief on Nutrition Food for Childrens