मुंबई : नवाब मलिक (Nawab Malik) यांना ईडीकडून (ED) अटक झाल्यानंतर महाविकास आघाडी (Mahavikas Aghadi) खवळून उटलीय. भाजपचा हा सरकार पाडण्याचा डाव आहे, असा आरोप महाविकास आघाडी करत आहे. राष्ट्रवादीने या अटकेविरोधात आंदोलन सुरू केलंय. तर दुसरीकडे काँग्रेस नेतेही ईडीविरोधात आणि भाजपविरोधात आग ओकत आहेत. दोन्ही बाजुचे नेते एकमेकांवर तुटून पडत आहेत. अशातच मंत्री यशोमती ठाकूर यांनीही ईडीला थेट आव्हान दिलंय. ईडीला सरकार बनवायची घाई लागली असेल तर शिवाजी पार्कात या आम्हीही सर्व येतो असे ट्विट केले आहे. तसेच अशा प्रयत्नांनी महाविकास आघाडी अजून मजबूत होणार आहे. असा इशाराही त्यांनी दिला आहे. तर भाजप नेत्यांनी नवाब मलिक यांच्या राजीनाम्यासाठी गाऱ्हाण सुरू केलंय. त्यामुळे आता पवार काय निर्णय घेणार? याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत.
यशमती ठाकूर यांचं थेट आव्हान
ईडी ला जर सरकार बनवायची घाई लागली असेल तर या, शिवाजी पार्कात या ! छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या साक्षीने आम्ही १७० जणं एकत्र भेटू. आणि एक सांगते, कदाचित तुमचं काम संपेपर्यंत १७० चा आकडा आणखी वाढलेला असू शकतो. MVA ची एकजूट तुटणार नाही, उलट मजबूत होतेय.
— Adv. Yashomati Thakur (@AdvYashomatiINC) February 23, 2022
नवाब मलिक यांच्या अटकेनंतर यशोमती ठाकूर यांनी थेट ईडीला आव्हान देत हल्लाबोल चढवला आहे. त्यांनी ट्विट करत…ईडी ला जर सरकार बनवायची घाई लागली असेल तर या, शिवाजी पार्कात या ! छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या साक्षीने आम्ही 170 जणं एकत्र भेटू. आणि एक सांगते, कदाचित तुमचं काम संपेपर्यंत 170 चा आकडा आणखी वाढलेला असू शकतो. MVA ची एकजूट तुटणार नाही, उलट मजबूत होतेय. असा इशारा दिला आहे. त्यामुळे सध्या मलिकांच्या एटकेनंतर महाविकास आघाडीतील नेते भाजपविरोधात एकत्र येताना दिसत आहेत.
भाजपची राजीनाम्याची मागणी
नवाब मलिक यांना ed ने अटक केलायंनातर त्यांना केबिनेट मंत्री राहण्याचा अधिकार नाही. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री तातडीने त्यांचा राजीनामा घेतील. अन्यथा आम्हाला आंदोलन करावं लागेल, असा थेट इशारा चंद्रकांत पाटलांनी दिला आहे. ज्या ज्या मंत्र्यांवर आरोप होऊन अटक होईल त्या सगळ्यांना राजीनामा द्यावा लागेल. अनेक मंत्री, नेते यांच्यावर गंभीर आरोप आहेत. नवाब मलिक यांची देहबोली म्हणजे गिरा तो भी टांग उपर अशी आहे, असा टोलाही त्यांनी लगावला आहे. महाराष्ट्रातील एक मंत्र्याला तरुणीच्या आत्महत्ये प्रकरणी राजीनामा द्यावा लागला, एक आत आहेत, एका नेत्याचा अनधिकृत बंगला पाडण्यात आला, एका नेत्याचे अनधिकृत रिसॉर्ट आहे, एका मंत्र्याला दोन पत्नी आहेत. किती मोठी यादी आहे. काय चाललंय हे? कोलमडले आहे सगळं, अशी खोचक प्रतिक्रिया पाटील यांनी दिली आहे.
Exclusive | मलिकांची अरेस्ट ऑर्डर टीव्ही 9 मराठीच्या हाती! मनी लॉड्रिंग ऍक्ट 2002च्या अंतर्गत कारवाई