यवतमाळ : लग्न समारंभाला आलेल्या चिमुकलीचा हॉटेलमधील सफाई कर्मचाऱ्याने विनयभंग केल्याचा धक्कादायक आरोप केला जात आहे. यवतमाळमध्ये लग्नाच्या हॉलवर घडलेला हा प्रकार सीसीटीव्हीमध्ये कैद झाला आहे. आरोपीला पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. (Yawatmal Marriage Hall Molestation)
यवतमाळमधील दारव्हा रोडवर असलेल्या एका हॉटेलमध्ये लग्न समारंभ होता. या लग्नाला दहा वर्षांची चिमुरडी आपल्या आई-वडिलांसोबत आली होती. चिमुरडी हॉलमध्ये फिरत असतानाच आरोपी सफाई कामगार अक्षय चांदेकर तिचा पाठलाग करत तिच्याजवळ पोहचला.
अक्षयने आधी तिच्या खांद्यावर हात ठेवून तिला खाऊचं आमिष दाखवलं. मात्र चिमुरडीने त्याला प्रतिसाद न दिल्यामुळे त्याने तिला जबरदस्ती उचलून एकांतात नेण्याचा प्रयत्न केला. घाबरलेल्या चिमुरडीने आरोपीच्या तावडीतून निसटत पळ काढला. विनयभंगाचा सर्व प्रकार हॉलमधील सीसीटीव्ही कॅमेरात कैद झाला आहे.
चिमुरडीने घडलेला प्रकार आई-वडिलांना सांगितल्यानंतर पोलिसांना बोलावण्यात आलं. पोलिसांनी आरोपी अक्षय चांदेकरला ताब्यात घेतलं आहे. अक्षय गेल्या काही दिवसांपासून या हॉटेलमध्ये साफ सफाईचे काम करतो. पोलिसांनी सीसीटीव्ही फूटेज ताब्यात घेतलं आहे. पोलिस या प्रकरणी अधिक तपास करत आहेत. (Yawatmal Marriage Hall Molestation)