न्यूयॉर्क : अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या धाकट्या भावाचे निधन झाले. अमेरिकेतील स्थानिक वेळेनुसार शनिवारी संध्याकाळी रॉबर्ट ट्रम्प यांची प्राणज्योत मालवली. वयाच्या 71 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. (Younger brother of US President Donald Trump Robert Trump died)
व्हाईट हाऊसने परिपत्रक काढून रॉबर्ट ट्रम्प यांच्या निधनाची दु:खद वार्ता दिली. रॉबर्ट ट्रम्प यांनी 26 ऑगस्टला वयाची 72 वर्षे पूर्ण केली असती, मात्र अवघ्या दोन आठवड्याआधीच त्यांनी जगाचा निरोप घेतला.
“अत्यंत जड अंतकरणाने मला सांगावे लागत आहे, की माझा भाऊ रॉबर्ट याचे देहावसान झाले” असे ट्रम्प यांनी शनिवारी रात्री सांगितले. “तो माझा फक्त भाऊच नव्हता, तर जिवलग मित्रही होता. त्याची खूप आठवण येईल. मात्र आम्ही पुन्हा भेटू. त्याच्या स्मृती माझ्या मनात चिरंतन राहतील. रॉबर्ट, आय लव्ह यू. रेस्ट इन पीस” अशा भावना डोनाल्ड ट्रम्प यांनी व्यक्त केल्या.
Very sorry to learn of the loss of President Trump’s brother, Robert. Please join me in keeping the entire Trump family in our prayers.
— Kevin McCarthy (@GOPLeader) August 16, 2020
न्यूयॉर्क शहरातील रुग्णालयात रॉबर्ट यांच्यावर उपचार सुरु होते. शुक्रवारीच डोनाल्ड ट्रम्प यांनी भावाची सदिच्छा भेटही घेतली होती. रॉबर्ट यांच्या आजारपणाविषयी अधिकृत माहिती समोर आलेली नाही. गेल्या तीन महिन्यात ते दुसऱ्यांदा रुग्णालयात दाखल होते.
हेही वाचा : Tik-Tok अमेरिकेला विका, नाहीतर चालते व्हा, ट्रम्प यांचा इशारा
रॉबर्ट ट्रम्प हे ट्रम्प ऑर्गनायझेशनचे माजी उच्च पदाधिकारी होते. ट्रम्प कुटुंबातील चार भावंडांपैकी ते एक होते. त्यांचे आणखी एक बंधू फ्रेड ट्रम्प यांचे 1981 मध्ये निधन झाले. पुतणी आणि फ्रेड यांची कन्या मेरी ट्रम्प हिच्यासोबत झालेल्या कायदेशीर लढाईमुळे रॉबर्ट ट्रम्प प्रकाशझोतात आले होते. (Younger brother of US President Donald Trump Robert Trump died)