पब्जी खेळण्यात मग्न, पाणी समजून अॅसिड प्यायला!

| Updated on: Jul 05, 2019 | 4:19 PM

भोपाळ (मध्य प्रदेश) : PUBG गेम खेळण्याचं व्यसन स्मार्टफोन वापरणाऱ्यांमध्ये झपाट्याने पसरु लागलं आहे. या गेममुळे अनेक तरुण-तरुणींचा जीव गेल्याच्या घटनाही गेल्या काही दिवसात घडल्या आहेत. नुकतेच मध्य प्रदेशच्या भोपाळमधील 25 वर्षीय तरुण पब्जी खेळण्यात इतका मग्न होता की, तो पाण्याऐवजी अॅसिड प्यायला. या घटनेनंतर तरुणाला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यामुळे सुदैवाने त्याचा जीव बचावला. […]

पब्जी खेळण्यात मग्न, पाणी समजून अॅसिड प्यायला!
Follow us on

भोपाळ (मध्य प्रदेश) : PUBG गेम खेळण्याचं व्यसन स्मार्टफोन वापरणाऱ्यांमध्ये झपाट्याने पसरु लागलं आहे. या गेममुळे अनेक तरुण-तरुणींचा जीव गेल्याच्या घटनाही गेल्या काही दिवसात घडल्या आहेत. नुकतेच मध्य प्रदेशच्या भोपाळमधील 25 वर्षीय तरुण पब्जी खेळण्यात इतका मग्न होता की, तो पाण्याऐवजी अॅसिड प्यायला. या घटनेनंतर तरुणाला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यामुळे सुदैवाने त्याचा जीव बचावला.

नेमकी घटना काय घडली?

भोपाळमधील तरुण घराच्या बाहेरील जागेत पब्जी गेम खेळत होता. गेम खेळण्यात तो इतका मग्न होता की, तो पाण्याऐवजी अॅसिड प्यायला. त्यानंतर तरुणाला तातडीने हॉस्पिटलमध्ये नेण्यात आले, त्यामुळे जीव वाचला. सध्या या तरुणाची तब्येत ठीक आहे, असं उपचार करणारे डॉ. गोगिया यांनी सांगितलं.

अॅसिड प्यायल्याने तरुणाचा घसा जळला आहे. तसेच, त्याच्या पोटात अल्सर झालं आहे आणि आतडे जळाले आहेत. मात्र आता त्याची तब्येत ठीक असल्याचे डॉक्टरांनी सांगितले आहे.

उपचार सुरु असतानाही तरुण PUBG गेम खेळत होता!

एवढी मोठी घटना होऊनही हा तरुण पुन्हा पबजीच्याच मागे पडला होता. अगदी उपचार सुरु असतानाही, पबजी गेम खेळत असल्याचे डॉक्टरांच्या निदर्शनास आले.

PUBG वर बंदी आणा, मध्ये प्रदेश विधानसभेत मागणी

तामिळनाडूनंतर पबजी गेम आता मध्य प्रदेशमध्येही बॅन करण्याची मागणी केली जात आहे. मंदसौरमधील भाजप आमदार यशपाल सिसोदिया यांनी मध्य प्रदेश विधानसभेच्या अर्थसंकल्प अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी पबजी गेम बंद करण्याची मागणी केली. कारण मुलांच्या परीक्षा जवळ आल्या आहेत. या गेममुळे सध्या तरुण अभ्यास करत नाहीत, असे मत सिसोदिया यांनी विधानसभेत मांडले.