मुंबई : फूड डिलिव्हरी कंपनी झोमॅटो सोशल मीडियावर आपल्या पोस्टमुळे नेहमी चर्चेत (zomato delivery boy smile) असते. आता झोमॅटोने सोशल मीडियावर एका झोमॅटो डिलिव्हरी बॉयचा फोटो आपल्या ट्विटर अकाऊंटवर ठेवला आहे. या डिलिव्हरी बॉयचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला आहे. त्यामुळेच झोमॅटोने त्याचा फोटो आपल्या प्रोफाईलवर ठेवला आहे.
गेल्या काहीदिवसांपासून सोशल मीडियावर झोमॅटोच्या एका डिलिव्हरी बॉयचा व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये डिलिव्हरी बॉयला त्याच्या कामाबद्दल विचारले जात आहे. ज्याचे उत्तर तो हसत हसत देत आहे. डिलिव्हरी बॉयच्या या गोड स्माईलने सोशल मीडियावर धुमाकूळ घातला आहे. त्याची स्माईल अनेकांना आवडल्यामुळे अनेकांनी त्याचा हा व्हिडीओ पाहिला आहे. आता पर्यंत लाखो लोकांनी त्याचा व्हिडीओ पाहिला आहे.
this is now a happy rider fan account
— Zomato India (@ZomatoIN) February 28, 2020
स्माईलला झोमॅटोने बनवले ट्विटर प्रोफाईल
झोमॅटोने आपल्या डिलिव्हरी बॉयच्या स्माईलला ट्विटर प्रोफाईलवर ठेवले आहे. आता हे हॅपी रायडरचे फॅन अकाऊंट बनले आहे, अशी पोस्ट झोमॅटोने केली आहे. या पोस्टनंतर काही मिनिटात पोस्टला हजारो लाईक्स मिळाले आहेत.
पाहा व्हिडीओमध्ये डिलिव्हरी बॉय काय म्हणतोय?
व्हिडीओमध्ये प्रश्न करणाऱ्या व्यक्तीने डिलिव्हरी बॉयला त्याच्या कमाईबद्दल विचारले. तेव्हा त्याने उत्तर देत सांगितले की, प्रति दिन 350 रुपये मिळतात. जी ऑर्डर कॅन्सल होते ती खायलाही मिळते. यावेळी झोमॅटो डिलिव्हरी बॉयच्या चेहऱ्यावर सुंदर अशी स्माईल दिसत आहे.